मागणी...
मारेगाव तालुक्याच्या भयाण व विदारक परिस्थितीने ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा
🔸मारेगाव तालुका काँग्रेस पक्षांची मागणी
🔸तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
मारेगाव : प्रतिनिधी
नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंताग्रस्त मनाला दिलासा देण्यासाठी सातत्याने पर्जन्यवृष्ठी होत असलेल्या मारेगाव तालुक्याला तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा अशा आशयाच्या मागणी संदर्भातील निवेदन मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणा खंडाळकर व तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलेल्या निवेदनात तूर्तास नैसर्गिक व बेंबळा प्रशासनाच्या बेताल कार्यपद्धतीने भयाण स्थिती शेतीची व शेतकऱ्यांची झाली आहे.उभ्या पिकांची अवस्था होत्याची नव्हती झाली असल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीतील उभे पिके पाण्याखाली आहे.शेकडो हेक्टर जमीन खरडल्या गेली.अशातच पूरपरिस्थितीने बळीराजाची आर्थिक अवस्था खस्ता झाली आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादनात या विदारक अवस्थेत आतापासून घट निर्माण होण्याची स्थिती आहे त्यामुळे आगामी दिवसात जगण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचे भयाण वास्तव आहे.
यात भरीसभर म्हणून बेंबळा प्रकल्पाच्या तकलादू धोरण शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरले आहे.नदीकाठावरील शेतजमिनी अजूनही पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडते आहे.सततच्या पावसाने रस्त्याची अवस्था बिकट आहे.तालुक्यातील बहुतांश गावातील छोटे पुलाला पूर येऊन अक्षरशः पूलच खचत असल्याचे वास्तव आहे.तालुक्यातील मोठ्या पुलांकरिता प्रस्ताव अनिवार्य झाले आहे. सलग पावसाने जवळपास पंधरा वीस गावातील संपर्क तुटतो आहे.परिणामी झालेल्या नुकसानीचे पुनर्गठन करून पीक कर्जाची ताबडतोब अंमलबजावणी करावी व ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीचा ओघ वाढवावा आणि शेतकऱ्यांना आगामी काळात जगण्याचा मार्ग सुकर करावा अन्यथा पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
तहसीलदार दीपक पुंडे यांचे मार्फत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिलेल्या निवेदन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणा खंडाळकर , तालुका अध्यक्ष मारोती गौरकार , मारोती सोमलकार , बबन तोंडासे , श्रीकांत गौरकार , तुळशीराम कुमरे , दिनेश चोपणे , प्रवीण नांने , गुरुदेव पचारे , दुमदेव बेलेकार यांचेसह बहुसंख्य शेतकऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
-
