मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये एकरी मदत द्या
🔸मनसे चे तहसीलदार मार्फत जिहाधिकारी यांना निवेदन
तालुक्यात झालेल्या अतिवृष्ठीने शेती पिके उध्वस्त होऊन शेतजमिनी खरडल्या गेली.झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान प्रदान करा अशी मागणी मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मागील पंधरा दिवसांत पर्जन्यवृष्ठीने व बेंबळा प्रकल्पाचे बेसूर नियोजनाने तालुक्यातील शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेले.बहुतांश ठिकाणी कालवे फुटल्याने शेतजमिनी खरडल्या गेल्या त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे.
परिणामी , शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावलेली असतांना सरसकट शेतकऱ्यांना प्रत्येकी एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत प्रदान करा व संकटातून मुक्त करावे अशी मागणी मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.सदरील मागणीचे निवेदन तहसीलदार दीपक पुंडे यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.निवेदन देतांना जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे , शहर अध्यक्ष शेख नबी , चांद बहादे , समीर सय्यद , आकाश खामनकर , गौरव कोवे , रवी चौधरी ,सौरभ सोयाम , इब्राहिम शेख ,बबलू विरुटकर आदींची उपस्थिती होती.