विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन
🔸मारेगाव तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा पुढाकार
तालुक्यात संततधार पाऊस कोसळत असून नदी, नाले व धरण तुडुंब भरलेले आहे त्यामुळे तालुक्यात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच सततच्या पावसामुळे काही शाळेच्या भिंती जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे काही विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरी भागात तसेच दुर्गम भागातून नजिकच्या शाळेत शिकण्यासाठी येत असतांना ओढ्याला पूर आल्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे या सर्व समस्यांचा विचार करून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळांना पुरपरिस्थिती आटोक्यात येईपर्यंत किमान आठवड्याची सुट्टी जाहीर करावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून देण्यात आले आहे
सन २०२१-२२ मध्ये ज्या शिक्षकांनी BLO चे काम केलेले आहेत अशा शिक्षकांना त्वरित मानधन देण्यात यावे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या व जे शिक्षक निवडणूकीच्या कर्तव्यावर होते अशा शिक्षकांना निवडणूक भत्ता मिळावा यासाठीही संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे निवेदन देते वेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष धर्मराज सातपुते, कार्याध्यक्ष दिगंबर दैने, उपाध्यक्ष पुंडलिक गेडाम, अतिरिक्त सरचिटणीस विद्याधर भालेराव, निकेश डोहणे, माणिक नाईक, मनोज लांजेवार व शेंगळेकर इत्यादीच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले