धक्कादायक...
मारेगाव तालुक्यातील शिवणी गावाला पुराचा वेढा
🔸नागरिकांच्या घरात शिरले पाणी
🔸तालुक्यातील हजार हेक्टर शेती पाण्याखाली
मारेगाव : दीपक डोहणे
पावसाची संततधार व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे मारेगाव तालुक्यातील शिवणी गावाला पाण्याने कवेत घेतले आहे.नागरीकांची पुरती तारांबळ उडत असतांना तालुक्यातील शेकडो हेक्टर वरील उभी पिके पाण्याखाली गेल्याचे धक्कादायक व भीतीदायक वास्तव आहे.
सातत्याने होत असलेल्या पर्जन्यवृष्ठीने व बेंबळा प्रकल्पाचे जवळपास १८ दरवाजे उघडल्याने पाण्याने मारेगाव तालुक्यात थैमान घातले आहे.तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमिनी पाण्याखाली गेली असल्याने शेतकर्यांचे चिंतेचे सावट गडद झाले आहे.
वरूनराजा पुरता बरसत असतांना वर्धा नदी ओव्हरफलो होऊन पाणी गावात शिरत आहे.शिवणी गावाला पाण्याने वेढा घातला असून नागरिकांची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगून ग्रामपंचायत इमारतीत अन्नधान्य हलविले आहे.आपटी गावातही पाणी गावात शिरले असल्याची माहिती आहे.चिंचमंडळ येथील माध्यमिक शाळेला पाण्याने वेढा घातला आहे.
पावसाचे सातत्य असल्याने हजारो हेक्टरवरील उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी कमालीचा आर्थिकदृष्ट्या विवंचनेत सापडून हवालदील झाला असल्याची विदारक परिस्थिती तालुक्यात शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकत आहे.