संवेदना...
मारेगावचे भीमराव तामगाडगे तर
बोटोणी येथील पप्पू विराणी यांचे हृदयविकाराने निधन
मारेगाव :- प्रतिनिधी
मारेगाव येथील वन विभाग प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त कर्मचारी भीमराव तामगाडगे यांचे मंगळवारला हृदयविकाच्या झटक्याने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय अंदाजे ६८ वर्षाचे होते.
भीमरावजी तामगाडगे हे नित्याप्रमाणे सकाळी उठून बाथरूममध्ये गेले.तिथेच त्यांना भोवळ येऊन निपचित पडले.लगेच त्यांना वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृतक भीमराव तामगाडगे यांच्या पश्चात पत्नी , पाच मुली , जावई व नातवंड असा मोठा आप्तपरीवार आहे.आज बुधवार सकाळी ११ वाजता स्थानिक स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
दरम्यान , बोटोणी येथील मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले सर्वांचे मित्र पप्पू विराणी यांचे बुधवारच्या मध्यरात्री १ वाजताचे सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.मृत्यूसमयी ते ५५ वर्षाचे होते.अविवाहित असलेले पप्पू विराणी मृदू स्वभावाने सर्वांचे निकटवर्ती होते.त्यांच्या पश्चात ३ भाऊ आहे.बोटोणी येथील स्मशानभूमीत त्यांचेवर दुपारी १२ वाजताचे दरम्यान अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.