शाळकरी विद्यार्थ्यांना आठवडाभर सुट्टी जाहीर करा
🔸 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी
🔸जिल्हाधिकारी यांना साकडे
मारेगाव : प्रतिनिधी
अलीकडच्या सलग येत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन प्रभावित होत आहे.अशातच शाळकरी विद्यार्थ्यांत कमालीची अस्वस्थता असतांना जिल्ह्यातील शाळांना किमान आठवडाभर सुट्टी जाहीर करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी आर्जव मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे.
सर्वत्र पावसाचा ओघ कायम असतांना जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणात होत आहे.नव्हे तर नदी, नाले ओसंडून वाहत आहे.येणाऱ्या दिवसातील पावसाचा जोर कायम राहणार असल्याची संभाव्य शक्यता आहे.
जोरकस पावसाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत कमालीची भिती निर्माण होऊन जनजीवन प्रभावित होत आहे.अशा प्रसंगी जीवावर बेतण्याचा प्रसंग ओढण्याची शक्यता नाकारता येत नाही.किंबहुना नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण मिळण्यासाठी जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालय किमान आठवडाभर बंद ठेवण्यासाठी सुट्टी जाहीर करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी आर्जव मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शुभम भोयर यांनी थेट जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून साकडे घातले आहे.