झरी :- प्रतिनिधी
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आता प्रशासनाकडून कृषी संजीवनी हा उपक्रम राबवने चालू झाले आहे.तालुका कृषी व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तालुका कृषी अधिकारी झरी यांच्या संयुक्त विद्यमाने झरी तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा करणे चालू आहे.यामध्य़े शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले जाणार आहे. राज्यात, जिल्यांसह व झरी तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवला जात आहे.यामध्ये कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी- कर्मचारी, कृषिमित्र हे परिश्रम घेणार आहेत. या योजनेचे गावनिहाय नियोजन करण्यात आले असून या दरम्यानच्या काळात कापूस पीक लागवड तंत्रज्ञान,सोयाबीन लागवडी पध्दती, तूर बीजप्रक्रिया, पिकांवरील कीडनियंत्रण, मुख्य कीड कशी ओळखावी याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पौष्टिक तृनधाण्याचे महत्व, महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमिकरण, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, प्रोगशील शेतकऱ्यांशी संवाद या सह आणखी अनेक बाबीचा समावेश यामध्ये होणार आहे.आत्तापर्यंत तालुक्यातील हिवरा वारसा, आडकोली, मांगुर्ला सह अनेक गावात संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला असून हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेत. यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मनोज जाधव, तालुका कृषी अधिकारी अमोल आमले, मंडळ अधिकारी हटवार साहेब, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषी मित्र यांनी कठीण परिश्रम घेतले.