खळबळजनक....
मारेगाव तालुक्यात गुरुजी अभावी जिल्हा परिषद शाळा वांझोट्या
🔸शैक्षणिक सत्र सुरू मात्र अर्धा डझन शाळेत शिक्षकांचा अभाव
🔸तालुक्यात १०१ शिक्षकांच्या पदांना भोपळा
मारेगाव : दीपक डोहणे
मागील दोन वर्षे कोरोनामुळे शैक्षणिक सत्रात शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले.विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले असले तरी त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे .यंदा मोठया जोमाने नवीन नवीन सत्राला सुरुवात झाली आहे.यातच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळात १०१ शिक्षकांची पदे रिक्त असून सहा शाळा शिक्षक नसल्याने या शाळा आता गुरुजी विना वांझोट्या ठरत आहे. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता टिकविण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरावी अशी मागणी जोर धरत आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १०४ शाळा आहे. पटसंख्येच्या आधारावर तालुक्यात ३३१ शिक्षक अनिवार्य आहे. परंतु सध्या तालुक्यात २३० शिक्षक कार्यरत असून तब्बल १०१ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शिक्षकांची पदे रिक्त असल्याने याचा विपरीत परिणाम अद्यापनावर होत आहे.जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेत आठ वर्ग आणि दोन किंवा तीन शिक्षक असे चित्र आहे.कोरोना मूळे दोन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्याची शून्यात गेल्याचे वास्तव असतांना आता शिक्षकांच्या कमतरतेमूळे संपूर्ण आयुष्य उध्वस्थ होण्याची वेळ तालुक्यातील विद्यार्थ्यावर ओढवली आहे.
या सोबतच शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त आहे. रिक्त पदामुळे शिक्षणाची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्याची मागणी विद्यार्थी व पालका कडून होत आहे.