राजू उंबरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
🔸प्रभाग चार च्या नगरसेविका अंजुम शेख यांचा पुढाकार
मारेगाव : प्रतिनिधी
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज बनली आहे.अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारला प्रत्येकी एक वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले.
प्रभाग क्रमांक चार मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका शेख अंजुम शेख नबी यांच्या विशेष पुढाकाराने व राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक वृक्ष लावून वृक्षारोपण काळाची गरज चे महत्व पटवून देत वृक्षारोपण केले.
याप्रसंगी नगरसेविका शेख अंजुम शेख नबी यांचेसह शांताबाई गव्हाणे , आरती गव्हाणे , अफ्रिन शेख आर्जु , शेख जबीन पठाण , भावना गव्हाणे , आरती राठोड , शमा शेख , शेख रिजवान , कांचन आत्राम , मनसेचे शहर अध्यक्ष शेख नबी , जमीर सय्यद , आकाश खामनकर , एजाज शेख , प्रा. सतीश पांडे , मुजफ्फर शेख यांचेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.