पिडीत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा
🔸मारेगाव तालुका शिवसेनेचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना साकडे
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे वाताहत झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजार रुपये एकरीप्रमाणे आर्थिक मदत करण्याची मागणी मारेगाव शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
तहसीलदार दीपक पुंडे यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात मारेगाव तालुक्यात अति पावसाने शेत जमिनीसह पिकांची पुर्णतः वाताहत झाली आहे.अशातच आता कर्जाचा डोंगर उभा ठाकला असतांना येणाऱ्या काळात जगणेही असह्य होत आहे.
अती पावसाने झालेल्या नुकसानीने वर्षभरातील उत्पादन पूर्णपणे मोडकळीस आल्याने मायबाप सरकारने पिडीत शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये तात्काळ अनुदान देऊन आर्थिक मदत करावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आले.तालुका प्रमुख संजय आवारी , सुभाष बदकी , सुनील गेडाम , दुमदेव बेलेकर , संजय लांबट , विनोद अवताडे ,चंद्रशेखर थेरे , मयूर ठाकरे , गणेश आसुटकर , डॉ.मनीष मस्की , अभय चौधरी , जीवन काळे , किसन मत्ते , गुरुदास घोटेकर , मनोज वादाफळे , ब्रह्मदेव जुनगरी , राजू मोरे यांची निवेदन देतांना उपस्थिती होती.