खळबळजनक...
तीन महिला मजुरांवर रानडुकराचा हल्ला
🔸वणी येथे उपचार्थ दाखल
🔸घोडदरा शिवारातील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
शेतीचा हंगाम सुरू होताच शिवारात रानडुकरे सैरभैर झाले असून मजुरवर्ग , शेतकरी हल्ल्याच्या अजेंड्यावर सर्वत्र दिसते आहे किंबहुना हल्ला चढवितांना तालुक्यातील घोडदरा शिवारात तीन महिला मजुरांना जखमी केल्याची दुर्देवी घटना रविवार रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
तूर्तास कपाशी टोबणीचे सत्र जोमात सुरू आहे. पावसाळा लागताच शिवार हिरवेकंच बनले आहे.अशातच रानडुकरे व जंगली प्राण्यांचा झुडुपात वावर कमालीचा वाढला आहे.रविवारला एका शेतातील महिला मजूर घरी परतत असतांना मागावून आलेल्या रानंडूकराने तीन महिला मजुरांवर जबर हल्ला चढविला. यात दुर्गा विठ्ठल नेहारे (१८ ) , कोमल गणेश जीवतोडे (१६ ) व आशा गणेश जीवतोडे (३८) सर्व रा. घोडदरा ता. मारेगाव ह्या जखमी झाल्यात.
दरम्यान , जखमींना मारेगाव येथे प्राथमिक उपचारानंतर वणी येथे हलविण्यात आले.रांनडूकराच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनेने शिवारात शेतकऱ्यांसह मजुरवर्गात कमालीचे भीतीचे सावट आहे.परिणामी जखमी महिलांना तात्काळ आर्थिक मदत प्रदान करावी अशी मागणी होत आहे.