मारेगाव तालुका जि.प./पं.स.आरक्षण जाहीर
कार्यकर्त्यांच्या मनात कभी खुशी -कभी गम ची लहर
🔸सर्वच राजकीय पक्षात हालचालीला कमालीचा वेग
🔸दावेदारीसाठी पुढाऱ्यांकडे लोटांगण
मारेगाव : प्रतिनिधी
चातकाप्रमाणे बहुप्रतिक्षेत असलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली.मारेगाव तालुक्यात जाहीर झालेल्या सोडतीत अनेकांना जोर का झटका धिरेसे लागला असून बार्शीग बांधलेल्या बहुतांश कार्यकर्त्यांना हा मार्ग सुकर झाल्याने पुढाऱ्यांच्या मनधारणीला कमालीचा वेग आला आहे.
मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत बोटोणी - वेगाव गटात सर्व साधारण अनु.जमाती तर कुंभा मार्डी गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले.
पंचायत समिती वेगाव गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र ), बोटोणी गणात अनु.जमाती महिला राखीव , कुंभा गण -सर्व साधारण महिला तर मार्डी गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले.
आरक्षण सोडत जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून काही हवसे गवसे नवसे आपल्या दावेदारीसाठी आपल्यालाच तिकीट बहाल व्हावी यासाठी पुढाऱ्यांकडे आत्तापासूनच लोटांगण घालत आहे.या आरक्षणाने अनेकांचा हिरमोड झाला असून बहुतांश कार्यकर्त्यांचा मार्गही सुकर झाल्याचे बोलले जात आहे.सर्वच राजकीय पक्ष या आखाड्यात आपले उमेदवार उभे करून रंगत आणणार आहे.