Type Here to Get Search Results !

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेला माणुसकीची झालर..!

जळका शाळेचे गुरुजी सरसावले..

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेला माणुसकीची झालर..!

🔸मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक केराम यांनी पूरग्रस्तांना पगारातून २० हजार रुपये कपात करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना दिले पत्र

मारेगाव : दीपक डोहणे
संकटकाळी मदत करतांना राजकीय पुढारी सरसावतांना अनेकदा दृष्टहीपथात आले.त्यातच सर्वसमावेशक कर्मचारी यापासून सुरक्षित अंतर ठेवतांनाचे अनुभव टाळता न येणारे आहे.मात्र याला अपवाद ठरले मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जळका जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेचे सहा.शिक्षक सुभाष मोतीराम केराम. स्वतः जुलै च्या पगारातून तब्बल २० हजार रुपये कपात करून ते पूरग्रस्तांना देण्याचे पत्र गटशिक्षणाधिकारी यांना दिले.मारेगाव तालुक्यातील भयाण ठरत असलेल्या पुरस्थितीला शिक्षकाचा असाही आधार पूरक ठरत मायबाप सरकारला तोंडात बोटे घालणारा ठरतो आहे.
      
मारेगाव तालुक्यातील मागील पंधरा दिवसापासून नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रश्न गडद केले आहे.पिकासह जमिनीचे प्रचंड नुकसान झाल्याने तालुक्यातील पिडीत शेतकरी शून्यात बघत आहे.प्रशासनाने पंचनाम्या करिता आदेश निर्गमित केले असले तरी  वास्तवात मदत मिळण्यासाठी किती दिवस लागतील याबाबत सारेच अनभिज्ञ आहे.मदत तोडकी मिळाली तर यातून पिडीत शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल काय ? त्यातून सावरेलही काय ? हे प्रश्न सर्वांकरिता तूर्तास अनुत्तरीत आहे.
     
अलीकडेच महागाईच्या भस्मासुराचे भूत सर्वांच्या मानगुटीवर बसलेले आहे.आवक पेक्षा गरजा अधिकच्या वाढल्या आहे.मदत करण्यास कुणी पुढे येत नाही.हे वास्तव टाळता न येणारे असले तरी यास मारेगाव तालुक्यातील जळका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सहा.शिक्षक सुभाष मोतीराम केराम अपवाद ठरते आहे.त्यांनी थेट मुख्याध्यापक मार्फत गटशिक्षणाधिकारी यांना पत्र देत माहे जुलै पेड इन ऑगस्ट २०२२  च्या पगारातून २० हजार रुपये पूरग्रस्तांसाठी कपात करण्याचे पत्र देत मदतीचा हात पुढे केला आहे.
          
विदारक स्थितीत व संकटात सापडलेल्या पिडीत शेतकऱ्यांना मदत ही आता अनिवार्य आहे.खरडलेली जमीन , पाण्याखाली असलेली पिके ,वाहून गेलेले शेती अवजारे,खते व आगामी उत्पादनात होणारी संभाव्य घट यामुळे शेतकऱ्यांची हालत खस्ता झालेली आहे.हातून पिके गेल्याच्या भीतीने बळीराजा चिंताक्रांत बनून शून्यात बघत आहे.या भयाण वास्तवाला गुरुजीची इवलीशी मदत 'केवळ फोटोसेशन' पेक्षा कमी नाही.मदतीची भावना गुरुजींनी कृतीत उतरविली असली तरी पुन्हा मदतीचा ओघ कायम ठेवण्यासाठी केराम गुरुजींचा "धडा" कोण कोण गिरविणार हा खरा प्रश्न पिडीत शेतकऱ्यांच्या वेदनेला फुंकर घालणारा ठरावा ह्याच माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.
सदरील शिक्षकाने गटशिक्षणाधिकारी यांना दिलेले पत्र समाज माध्यमात वेगाने फिरत आहे.या बाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी केराम सर यांना भ्रमध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न ' विदर्भ सर्च न्यूज ' ने केलाय.मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies