मारेगावच्या नियोजित पेट्रोल पंपवर पोलीस अधिक्षकांची भेट
🔸कामकाजाचा घेतला आढावा
🔸एस.डी.पी.ओ , ठाणेदार यांची उपस्थिती
मारेगाव पोलीस स्टेशनच्या शेजारी अवघ्या दिवसातच भारत पेट्रोलियम कंपनी जनतेच्या सेवार्थ सुरू होत आहे.त्याचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी आज शनिवारला धावती भेट दिली.कामाची गती वाढवून जनतेच्या सेवार्थ तात्काळ पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी सूतोवाच केले.
मागील सहा महिन्यांपूर्वी पासून मारेगाव येथील वाहन धारकांच्या सेवार्थ मारेगाव पोलीस स्टेशन शेजारी भारत पेट्रोल पंप ची नियोजित निर्मिती होत आहे.अंतिम टप्प्यात असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी भेट देत ठाणेदार राजेश पुरी यांच्या कडून आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी विशेष सूचना करीत कामाजावर समाधान व्यक्त केले.याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुंजलवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान वाहन धारकांच्या सेवार्थ अवघ्या दिवसातच पेट्रोल पंपचे काम पूर्णत्वास जाऊन पेट्रोल विक्री सुरू होणार आहे.
