Type Here to Get Search Results !

मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांचा गौरव

मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांचा गौरव

🔸साई सेवा समितीचा पुढाकार


मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार राजेश पुरी यांचा मारेगाव येथील साई  सेवा समितीचे वतीने गौरव करण्यात आला.
मारेगाव शहरात  मागील अनेक वर्षापासून सामाजिक व धार्मिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या साईबाबा मंदिर पुरस्कृत साई सेवा समिती मार्फत विविध शासकीय तथा प्रशासकीय सेवेतील अधिकारी व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमातील नागरिकांच्या  कार्याची दखल घेऊन गौरविण्यात येते.या उपक्रमाने समितीने आगळावेगळा पायंडा रचला असल्याने शहरात सर्वधर्मसमभावाची झालर उमटत आहे.
दरम्यान , प्रशासकीय कामाची दखल घेत मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांना साई सेवा समिती कडून शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष विनोद बदकी , सचिव गजानन चंदनखेडे , पुंडलिक नक्षणे , शब्बीर खान पठाण , राजू बदकी , मारोती देवाळकर , मधुकर निरगुडवार , वंदना बदकी , सुवर्णा चंदनखेडे , नलिनीताई बदकी यांचेसह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies