शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देऊन मारेगाव तालुका ओला दुष्काळ घोषित करा
🔸मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीची मागणी
🔸तालुका अध्यक्ष , तमाम पदाधिकारी तथा कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन
तालुक्यातील बेंबळा प्रकल्पा सह नैसर्गिक संकटाने शेतजमिनी खरडून पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी पुरता आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.त्यामुळे तात्काळ आर्थिक पॅकेज देऊन मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा अशी आर्जव मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे.
तालुक्यातील शेत जमिनीची पूर्णपणे वाताहत झाली असून यास बेंबळा प्रकल्पाचे बेजबाबदार पणाने बांधकाम केलेले कालवे कारणीभूत ठरले.त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन खरडल्या गेली.अशातच सातत्याने आलेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर येऊन पाणी शेतात शिरले आणि पिके पाण्याखाली गेली. ही विदारक स्थिती शेतकऱ्यांच्या वाट्याला आल्याने बळीराजा पुरता आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे.आगामी दिवसात उत्पन्नात घट होण्याचे संकेत असतांना भविष्यातील कुटुंबाचा गड कसा हाकावा ही विवंचना पिडीत शेतकऱ्यांच्या मनात असल्याने प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून आर्थिक पॅकेज देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमूख मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
नायब तहसिलदार भगत यांनी निवेदन देते वेळी भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे , तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे , विठ्ठल दानव , प्रतीक धानकी , अनुप महाकुलकार , नंदकुमार खापणे , राहुल राठोड , दत्तू लाडसे , मारोती राजूरकर , विश्वजित गारघाटे , नवसु सुडीत , शैलेश ठक आदींची उपस्थिती होती.