म्हणे..मारेगावात समस्या सोडवण्यासाठी लागतो ठराव
🔸नगरपंचायतचा अजब फतवा अन नवा जावई शोध
🔸पावसाचे पाणी अनेकांचे घरात
🔸ईमारत व अधिकारी उरले नावालाच
🔸लोकप्रतिनिधी केवळ नामधारी झाल्याची चर्चा
मारेगाव : कैलास ठेंगणे
निर्मितीपासून बेताल व गहन चर्चेचा विषय राहिलेल्या नगरपंचायत नियमित वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. नागरिकांच्या समस्या किती सुटल्या यापेक्षा अधिकारी किती गडेलठ्ठ झाले. याचा पूर्ण अनुभव शहरवासीयांना मुखपाठ आहे. नव्या दमाचे, नव्या जोमाचे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत कसे बनत असल्याचा अनुभव २० जुलै रोजी झालेल्या धुवाधार पावसाने मारेगावकरांना अनुभवायला लावला.
मारेगाव शहरवासीयांची आन-बान शान असलेली टोलेजंग इमारत म्हणजे नगरपंचायत. या इमारतीतून उंटावरून शेळ्या हाकलल्या सारख्या शहराचा सर्वांगीण विकासाच्या गप्पा हाकल्या जाते. रातोरात लाखो रुपयाच्या निधीची मर्यादित सवंगडीच्या माध्यमातून विल्हेवाट लावले जाते.हे वास्तव असतांना जनतेच्या डोळ्यात अजूनही धूळ फेकली जात आहे.
मात्र शहरात २६ जुलै रोजी झालेल्या धुवाधार पावसाने नगरपंचायत प्रशासनाची पुरती पोलखोल केली अन् टोलेजंग इमारत हलली. नगरपंचायतची चुकीचे कामे नागरिकांच्या पथ्यावर पडली.शहरातील अनेक गरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरले .प्रभाग क्रमांक चार व सहा मधील रस्त्याचे पाणी घरात शिरल्यामुळे कुटुंबाची कुचंबणा होत अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना इतरत्र स्थलांतरित व्हावे लागले. ही माहिती अधिकारी व नगराध्यक्ष कळली. ते धावा धाव करीत गल्लो गल्ली फिरले.तुमच्या घरात पाणी शिरले आहे , हे वास्तव आहे मात्र 'ठराव' घेतल्याशिवाय तुमच्या दुःखावर पांघरून घालू शकत नाही. असा नविन जावई शोध लावत आपले कर्तव्यच वेशीवर टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या दमान प्रभागात पाहणीचां आव आणत सुसाट फिरणाऱ्या लोकप्रतिनिधी तथा कर्मचारी आम्ही किती कर्तव्यदक्ष आहो याची प्रचिती देत प्रभागातील विदारक समस्या केवळ डोळ्यात साठवून काढता पाय घेतला. मात्र या विदूषक भुमिकेने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटल्यास अधिकाऱ्यांना पळता भूई करणार असल्याचे मत आता संतप्त जाणकार व्यक्त करत आहे.
शहरात बहुतांश ठिकाणी चिखलाचे साम्राज्य आहे.ज्यांना नाहक त्रास होतो आहे अशांना तात्पुरता मुरूम टाकून वेळ काढण्याचेही सौजन्य दिसत नाही.त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.मात्र मूग गिळलेल्या प्रशासनाची कर्तव्याप्रतिची जागृती येथे पंगू झाल्याचे निदर्शनास येत आहे.