आत्महत्येची धग...
अतिवृष्टीला कंटाळून मारेगाव तालुक्यातील चोपण येथील शेतकऱ्याची आत्महत्या
🔸सातत्याने येत असलेल्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
मारेगाव : प्रतिनिधी
संततधार पावसाने शेतातील पिकाची दयनीय अवस्था पाहून असह्य झालेल्या चोपण येथील गजानन उर्फ सुरेश लहूदास खिरटकर वय ४५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.
मारेगाव तालुक्यातील चोपण येथील गजानन उर्फ सुरेश लहूदास खिरटकर यांचे ९ एकर शेती आहे यावर्षी संततधार पाऊस सुरु असल्याने पिकाची अवस्था होत्याची नव्हती झाली. आगामी काळात जीवन कसे जगावे यामुळे सतत ते विवंचनेत असे. अखेर त्यांनी दि. २५ जुलै रोजी ला सकाळी १०.३०वाजताचे दरम्यान आपल्या राहत्या घरी एजिल नावाचे तणनाशक औषध प्राशन केले.त्यांना तात्काळ मारेगाव येथे उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
मागील काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र कहर माजविला असून अनेक शेतकऱ्यांच्या जमीन खरडून पिके पाण्याखाली गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडल्याचे भयाण वास्तव आहे.