अन् प्रशासनासमोरच पिडीत शेतकऱ्याने धाय मोकळून अश्रूला वाट मोकळी केली...!
🔸हिरव्याकंच हंगामातील हिरव्या स्वप्नांचा रंग झाला फिका
🔸शेकडो शेतकऱ्यांच्या धीरगंभीर अवस्थेची वेदनेकडे वाटचाल
मारेगाव : कैलास ठेंगणे
वर्धा नदीला तब्बल २८ तब्बल वर्षांने आलेल्या माहपुराने नदीकिनारी असणाऱ्या गावाचे होत्याचे नव्हते झाले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कष्ट करून जोमात आलेले पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामुळे पुढील जीवनाचा प्रवास कसा हाकावा या विवचंनेत असलेल्या शेतकऱ्याचा अश्रूचा बांध फुटला आणि तो धाय मोकळून ढसाढसा रडल्याची घटना काल २० जुलै रोजी तहसील कार्यालय मारेगाव येथे घडली.
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील गरीब शेतकरी गुरुदेव गणपत पचारे ह्या दोन हेक्टर बेचाळीस आर शेतजमिनीवर कसाबसा कुटुंबाचा गाडा हाकत होता. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व कुक्कुटपालन ही त्याने सुरू केले होते.माञ १८ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व वर्धा नदीच्या पुराणे संपूर्ण होत्याचे नव्हते केलें. संपूर्ण शेत जमीन पाण्याखाली गेली. शेत पिकासह शेती खरडून गेली. त्याचं सोबत १००० नग कोंबडे, सहा नग बकऱ्या ,१२० बॅक रासायनिक खत, शेती उपयोगी अवजारे, पशुखाद्यासह सर्वच पुराच्या पाण्यात जमिनीदोस्त झाले .
यात शेतकऱ्याचे जवळपास तीन लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाले. त्यामुळे हा लाथ मारीन तिथे पाणी काढणारा शेतकरी पुरता हतबल झाला . त्यामुळे धगधगत्या जगण्यावरच्या निखार्यावर आलटून पालटून शेकावा तसा शेतकरी चारी बाजूने शेकल्या जात असल्याने पुढील जीवनाचा कौटुंबिक गाडा कसा हाकावा हा आ वासून प्रश्न उभा ठाकल्याने त्यानें थेट तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार दीपक पुंडे यांना हकीकत सांगताना त्याचा अश्रूचा बांध फुटला. अन् शेतकरी ढसाढसा रडला . त्यामुळे त्याला जगण्यासाठी बळ देण्याची मागणी त्याने प्रशासनाकडे अर्जाद्वारे केली.
दरम्यान , अनाहूतपने आलेल्या संकटाने शेतकरी पुरता भांबावल्याने लाखो रुपयांचे आर्थिक संकट ओढावले आहे.मारेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या धीरगंभीर अवस्थेची वेदनेकडे वाटचाल कायम आहे.
संबंधित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.दीपक पुंडेतहसीलदार मारेगाव