तालुका प्रशासनाचा असाही असंवेदनशीलपणा
🔸शेतकरी पंचनामाच्या प्रतीक्षेत
🔸आपत्ती निवारण केंद्राचा नंबर बंद
प्रशासन संवेदनशील असेल तर नागरिकांची कामे व समस्या विहित वेळेत चुटकी सरशी सुटते. मात्र प्रशासन "सांग पाटला काय करू" असेल तर ते नाममात्र राहते. असाच काहीसा प्रकार तालुका प्रशासनाचा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मागील दहा दिवसापासून तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. सूर्याचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. सततचा पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. यादरम्यान अनेक गावाचा तालुक्याची संपर्कही तुटत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. काही घराची पडझड सुद्धा झाली आहेत . वीज पडल्याने जीवितहानी झाली आहे. दरम्यान बेंबळा प्रकल्पाची कालवे फुटल्याने कुंभा, मार्डी, देवाळा, दांडगाव, आपटी, महागाव ,सिंधी ,रामेश्वर, पाहपळ सह आधी गावातील शेकडो हेक्टर शेत जमीन खरडून गेली. पिके वाहून गेली. शेतातील जनावराचे वैरणासह खते खराब झाली. शेतीसह शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. एवढी गंभीर परिस्थिती असताना प्रशासन मात्र सुस्त दिसत आहे.
प्रशासनाची धुरा सांभाळणारे गावोगावात जाऊन भेटी देत आहे. मात्र प्रशासन गतिमान करणारे तलाठी, मंडळ अधिकारी, व इतर अधिकारी बिनधास्त दिसत आहे. बुधवार उजळून सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर साधा तलाठी पोहोचलेला नाही. कोतवाला मार्फत कामे करणारी यंत्रणा अतिशय निष्काळजीपणाने शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेली दिसत आहे. त्याचबरोबर तालुका आपत्ती निवारण केंद्राचा7237237243 क्रमांक कायम बंद येत असल्यामुळे रात्री बे रात्री नागरिकांनी कुठे संपर्क साधावा हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे प्रशासन नागरिकाप्रति किती संवेदनशील आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रशासनातील मुख्य अधिकारी संवेदनशील असून उपयोग नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
राजकीय पक्ष बांधावर
तालुक्यातील दोन विभागात निसर्ग संकटासह बेंबळा प्रकल्पाच्या तकलादू धोरणाचा परिपाक शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला.अनेकांच्या शेतातील प्रचंड नुकसान यंदा भरून निघेल ही आशा मावळली आहे.किमान धीर देण्यासाठी आमदार महोदय सह भाजप कार्यकर्ते व काँग्रेस पदाधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागात भेट दिली.ही भेट केवळ वांझोटी ठरू नये एवढी किमान अपेक्षा पिडीत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.परिणामी अद्यापपावेतो सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे पाय मात्र सरसावले नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळत आहे