खळबळजनक..
शेतात वीज पडून कपाशीची ३५० रोपटे जळाली
🔸वेगाव शिवारातील घटना
🔸पिडीत शेतकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक
वेगाव : राजू पिपराडे
मागील पाच दिवसापासून सातत्याने पडत असलेल्या पावसात सोमवारच्या मध्यरात्री तालुक्यातील वेगाव शिवारात अचानक वीज कोसळून कपाशीचे किमान ३५० रोपटे जळाल्याची घटना मंगळवारला उघडकीस आली.
मारेगाव तालुक्यासह सर्वत्र पावसाचा हाहाकार सुरू आहे.सातत्याने पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे शिवारात जाने दुरापास्त झाले आहे.अशातच पिकांची वाढही खुंटली असतांना कपाशी तथा सोयाबीन उत्पादनात कमालीची घट होण्याची संभाव्य शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अस्मानी , सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या मागावर असतांना मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे सोमवारला रात्री आज अचानक विजेची कडकडाट होऊन येथील शेतकरी सचिन मोहितकर यांच्या शेतात वीज पडली.शेतात कपाशी असतांना जवळपास ३५० रोपटे जळाली आहे.यात शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाल्याने तात्काळ आर्थिक मदत प्रदान करावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्याने केली आहे.