Type Here to Get Search Results !

खुद्द नगरसेवकालाच उचलावे लागले मुरुमाचे टोपले

नगरपंचायतचा बेतालपणा....

खुद्द नगरसेवकालाच उचलावे लागले मुरुमाचे टोपले

🔸प्रशासनाचा उर्मटपणा कारणीभूत
🔸प्रभाग क्रमांक १२ मध्ये चिखलाने नागरीक प्रभावित
🔸प्रशासन कुंभकर्णी झोपेत
मारेगाव : प्रतिनिधी
येथील प्रभाग क्रमांक १२ मध्ये मुख्य रस्त्याने येजा करण्यास नागरिकांना प्रचंड नाहक त्रासाला सामोर जावे लागत असतांना या संदर्भात वारंवार नगरसेवक हेमंत नरांजे यांनी सुचना करून कायम दुर्लक्ष करण्याचा कळस गाठणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाचा निषेध करीत खुद्द नगरसेवकासह येथील नागरिकांनी रस्त्यावर मुरूम टाकत नागरिकांना दिलासा दिला.मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या बेताल आणि मुजोर प्रशासनाचा या निमित्ताने पुन्हा परिचय झाला.
     
येथील प्रभाग क्रमांक १२ मध्ये जाण्यास पावसामुळे अनेक अडथळे निर्माण होत होते.त्यामुळे नगरसेवक हेमंत नरांजे यांनी प्रशासनास सूचना करून सिमेंट पाईप टाकण्याचे आदेश दिले.सिमेंट पाईप टाकून प्रशासनाच्या मजुरांनी माती टाकली त्यामुळे अनेकांना पायदळ  व दुचाकीस्वारास येजा करतांना घसरगुंडी होत होती. भविष्यात मोठा अपघात होईल अशी संभाव्य शक्यता असतांना ही गंभीर बाब ओळखून नगरसेवकांनी अभियंत्यास मुरूम टाकण्याची सूचना  वारंवार भ्रमनध्वनी ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र बहुचर्चित अभियंता कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने आपल्या गुर्मीचा परिचय पुन्हा पदरी पाडला. यासंदर्भातील आपण लवकरच वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा हेमंत नरांजे यांनी दिला.
     
परिणामी , प्रशासन आपल्या कर्तव्याचा बेतालपणा व निष्काळजीपणा दाखवीत असल्याने खुद्द नागरिकांना घेऊन नगरसेवक हेमंत नरांजे यांनी सदरील कामावर स्वतः मुरूम टाकला.आपल्या प्रभागातील कर्तव्यात कुठलाही कसूर न ठेवता जनसेवेसाठी आपल्या पदाचा सदैव उपयोग करीत राहण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला .तर निगरगट्ट प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या बेताल स्वभावाने खुद्द नगरसेवक यांना मुरुमाचे टोपले उचलण्याची वेळ आल्याने विकास कामाबाबत हे प्रशासन किती गंभीर आहे याचा परिचय दिला.दरम्यान , नगरसेवकाच्या विशेष सहकार्याने येथील नागरिक समाधान व्यक्त करीत असून प्रशासन अभियंत्यांच्या संतापजनक व कामचुकार धोरणाची तक्रार थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्रत्यक्षात मांडून उचलबांगडीची मागणी लावून धरण्याचा एल्गार यावेळी नगरसेवक सह नागरिकांनी पुकारला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies