ती च्या स्वैराचारापुढे मातृत्व पडले थिटे
🔸️सगनापूर येथील घटनेने समाजमन सुन्न
🔸️ती दोन लेकराची आई.. प्रियकर सह
जायची घाई
मारेगाव : दीपक डोहणे
ती दोन कोवळ्या लेकराची आई.पती , पत्नी व दोन मुले असं कुटुंब गोड्यागुलाबीने नांदत असतांना तिच्या आयुष्यात तिसरा टपकला,सुखी संसारात प्रेमाचा स्वैराचार आडवा आला.दोन लेकराची माय एका पस्तीस वर्षीय युवकाच्या प्रेमात बेभान आकंठ बुडाली.एवढेच नव्हेतर दोन चिमुकल्यांना रडत सोडून त्याच्या सोबत लग्नच करण्याचा बेत आखला.चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून जाण्याची तयारी असतांना नातेवाईका सह निवडक ग्रामस्थांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.पण प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत तिच्या स्वैराचारापुढे मातृत्व थिटे पडत आहे.समाजमन सुन्न करणारी ही लाईव्ह घटना सगणापूर येथे खमंग चर्चेला उधाण आणत आहे अन तिच्या बेताल वागण्याने संतापही व्यक्त होत आहे.पोलिसही या स्टोरीने चक्राउन गेले आहेत.
सगणापूर येथील दोन कोवळ्या लेकरांची विवाहित आई एका ऑटो चालकाच्या प्रेमात आकंठ बुडाली,काल सर्वांसमोर ती बॅग भरून आपल्या प्रियकर सोबत जायला निघाली. सर्वत्र एकच कल्लोळ उडाला,गावातील प्रतिष्ठित लोक तिला खूप समजवायला लागले,पण ती मानायला तयार नोहतीच.अखेर तिच्या पतीने सासूबाई म्हणजेच तिच्या आईला घेऊन मारेगाव पोलीस ठाणे गाठले.पोलिसही या घटनेने गांगरून
गेले.तिच्यावर कोणता गुन्हा दाखल करावा हा प्रश्न उभा झाला.आज प्रियकर सह तिलाही ठाण्यात बोलावून घेतले,खूप समजावून सांगितले, पण परिणाम शून्य झाला.दोन्ही चिमुकले मायला धरून आभाळभर रडले,पण ती आंधळ्या वासनेपुढे बधली नाही.मातृत्व थिजले अन पती,आई,सासू,भाऊ व बाळांना सोडून ती प्रियकरचा हात धरून निघून गेली.उद्या पुन्हा पोलिसांनी त्या दोघांना बोलाविले आहे, आपसी सोडचिठ्ठी घेऊन ती उद्या मुक्त होणार आहे.या घटनेने समाजमन पुरता हादरलाय. यातून सामाजिक स्तर किती रसातळाला जात आहे हे चिंताजनक असून या नात्याला ' ये रिश्ता क्या कहलाता है ..म्हणण्याची वेळ आली आहे.