चिंचमंडळ परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय
🔸️विरोधी गटाचा सपशेल पराभव
मार्डी : प्रतिनिधी
तालुक्यातील सहकार क्षेत्र असलेल्या व राजकीयदृष्ट्या सर्वांच्या नजर लागलेल्या चिंचमंडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने घवघवीत यश संपादन करून विरोधी पॅनल असलेले जगन्नाथ बाबा सहकार पॅनलचा धुव्वा उडविला.
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील सहकार क्षेत्रातील निवडणूक दोन्ही पॅनेलने वर्चस्वाची बनविली होती.तालुक्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या सोसायटीच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी राजकीय डावपेच आखत आपल्या पॅनल ची सत्ता आरूढ करण्यावर भर दिला.मात्र परिवर्तन पॅनल समोर जगन्नाथबाबा पॅनलने नांगी टाकत परिवर्तन पॅनलचे देविदास मोरे , मोरेश्वर चटकी , प्रशांत भुते , भास्कर चटकी , सुरेश ताठे , भास्कर सोनटक्के , नागो पचारे , अरुण उरकुडे , रमेश लसने , कुसुम दानव हे तेरा पैकी दहा उमेदवार भरघोस मतांनी विजयी होत येथील सोसायटीची सत्ता काबीज केली.
विजयी पॅनल चे नेतृत्व व पुढाकार दिवाकर सातपुते , प्रवीण विखनकर , दिगांबर वानखेडे , प्रेमराज ताठे , सुरेश दानव यांनी घेतला.