कांचन आवारी विद्यार्थिनीचा मनसे महिला आघाडी कडुन गौरव
🔸️बारावीच्या परीक्षेत उपविभागात प्रथम आल्याने सर्वत्र होतोय गौरवाचा वर्षाव
🔸️भविष्यात शिक्षणासाठी अडचणींवर मात करण्यासाठी मनसे तत्पर असल्याचे दिले अभिवचन
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील शेतकऱ्यांची मुलगी कु. कांचन संतोष आवारी या विद्यार्थ्यांनीने मारेगाव येथील महाविद्यालयातुन उपविभागातुन प्रथम येण्याचा मान मिळविला. तिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्षाच्या वतीने विद्यार्थिनीच्या स्वगावी कोलगाव येथे सन्मान करुन पुढील शिक्षणासाठी काही अडचण आल्यास मनसे तर्फे सहकार्य करु असे मनसे महिला जिल्हा अध्यक्षा सौ.अर्चना बोदाडकर यांनी अभिवचन दिले. कु.कांचन आवारीचा गौरव करतांना त्या बोलत होत्या .
कोलगाव या शेतीप्रदान गावातील शेतकरी कन्या कु. कांचन संतोष आवारी ही विद्यार्थ्यांनी मारेगाव येथील महाविद्यालय येथून उपविभागातुन प्रथम आली ,कांचनचे सर्वस्तरातुन कौतुक होत असुन ,रविवारी मनसे महिला जिल्हा अध्यक्ष सौ. अर्चना बोदाडकर यांनी कु.कांचन आवारीचा कोलगाव येथे जाऊन सन्मान केला ,पुढील शिक्षणात काही अडचन आल्यास मनसेच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याच आश्वासन देण्यात आले,यावेळी मनसेच्या महिला जिल्हा अध्यक्ष अर्चनाताई बोदाडकर , मारेगाव शहर अध्यक्ष सिंधुताई बेसेकर, प्रभा ढेंगळे ,कोलगांवच्या सरपंच अभीषाताई निमसटकर , वैषाली ताई तायडे ,छायाताई आवारी, सौ. विजयाताई आवारी ,कांताताई गौरकार, सतीष पारखी , मयुर निब्रड, अनुप वासाडे उपस्थित होते.