मारेगाव विज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार
🔶वीज कनेक्शन नसताना दिले बिल
🔶अजब कारभारा प्रती रोष
मारेगाव :- प्रतिनिधी
तालुक्यातील कुंभा येथील एका शेतकऱ्याच्या नावाने मिटर नसताना सुद्धा वीज वितरण कंपनीने विज बिल देयक दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या भोंगळ कारभाराने शेतकऱ्याला नाहक त्रासाला समोर जावे लागत असल्याने वीज वितरण कंपनीच्या अजब गजब कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
कुंभा येथील शेतकरी विजय गणपत मांडवकर याचे शेत सर्वे नंबर 342 मध्ये कृषी पंपा करिता मीटर जोडणी करीता 2017 साली वीज वितरण कडे अर्ज केला होता. 2018साली सदर शेतकऱ्याने डिमांड भरली. मात्र पाच वर्षे उलटून सुद्धा विज जोडणी करून मीटर देण्यात आले नाही. त्यामुळे ते वीज वितरण कार्यालयात चौकशी करिता गेले असता त्यांना धक्काच बसला. त्यांच्या शेतातील पाच पोलची कामे पूर्ण झालेली दर्शविला. त्यापोटी संबंधित कंत्राटदाराला त्याची रक्कम अदा करण्यात आली अशी नोंद शासन दरबारी घेतल्या गेली. वीज वितरण कंपनीने त्यांना ग्राहक क्रमांक 370440011251 दर्शवित त्यांच्यापुढे मार्च 2022 चे4680 बिल त्यांच्यापुढे केले.
मात्र आपल्या शेतात वीज वितरण कंपनीने कुठलेही काम केले नाही. माझ्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचे मीटर बसविले गेले नाही. त्यामुळे कसल्याही प्रकारचे रीडिंग घेण्याचा प्रश्नच येत नाही असे असताना सदर शेतकऱ्याला विज बिल कसे देण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे. वीज वितरण कंपनीच्या आंधळ्या कारभाराचा फटका अशा अनेक शेतकऱ्यांना बसत असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यात उमटू लागल्या आहे.
ग्रामीण अभियंत्याकडून अपमानास्पद वागणूक
सदर शेतकरी वीज वितरण चे ग्रामीण अभियंता यांच्या कार्यालयात गेली असता त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कामे न करता बिल काडून ठेकेदारावर मेहेरनजर दर्शवणाऱ्या तत्कालीन ग्रामीण अभियंत्यावर कार्यवाहीची मागणी केली जात आहे.
१)वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या काम करण्याच्या पद्धतीने शेतकऱ्यावर मोठा अन्याय झाला आहे . त्याच बरोबर कुंभा परिसरात विजेचा लपंडाव न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.जयवंत ठेपालेविभागीय सचिव भाजपा
२) ग्रामीण अभियंत्याला सदर प्रकरणाची रिपोर्ट तात्काळ सादर करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर सदर शेतकऱ्याची कामे तात्काळ करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहे.एस. एम. पाटिलउपविभागीय उपकार्यकारी अभियंतामारेगांव
