शौचास गेलेल्या युवकावर रानडुकराचा हल्ला
🔸️डोलडोंगरगाव येथील घटना
🔸️जखमी युवकास वणी येथे उपचारासाठी केले दाखल
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील डोलडोंगरगाव येथील युवक आज रविवारला सकाळी शौचास जात असतांना मागावून आलेल्या रांनडूकराने जबर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना शिवारात घडली.
वासुदेव सदाशिव भोसले (२४) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो आज सकाळी गावालगत शेजारच्या शेतात शौचास जात असतांना अचानक मागवून आलेल्या रानडूकराने जबर हल्ला चढविला.यात युवकास गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून उपचारासाठी वणी येथे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान , वन विभागाने तातडीने दखल घेऊन मदतीची याचना कुटुंबाकरवी करण्यात येत आहे.