Type Here to Get Search Results !

मारेगाव रुग्णालयात अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

मारेगाव रुग्णालयात अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

🔸️ओळख पटल्यास तात्काळ मारेगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन
    
मारेगाव : प्रतिनिधी
येथील राज्य महामार्गावर एकांतात जीवन कंठत असलेल्या अनोळखी इसमाची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना मारेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज शुक्रवारला मृत्यू झाला.अजून पर्यंत त्यांची ओळख पटली नसून छायाचित्रावरून ओळख पटल्यास मारेगाव पोलिस स्टेशन तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
      
मागील अनेक दिवसांपासून मारेगाव राज्य महार्गावर एकांतवासात जीवन जगणारा ५५ वर्षीय इसमाची प्रकृती बिघडली.आरोग्य विभागास माहिती होताच त्यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.भुकेने व्याकुळ आणि अशक्तपणा यामुळे ते काहीच बोलत नव्हते.मराठी भाषा बोलणारा हा अनोळखी इसम पाण्याशिवाय काहीच मागत नव्हता.अशातच स्वतःचे नाव सांगण्याची तसदी घेत नव्हते.त्यामुळे नाव व गाव प्रशासकीय दप्तरात नोंद घेणे अवघड झाले.अशातच मागील पंधरा दिवसापासून उपचार सुरू असतांना त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला.ओळख पटली नसल्याने त्यांना गार शवपेटीत ठेवण्यात आले आहे.
     
सदर इसम काळी पॅन्ट , पांढरा शर्ट व दाढी वाढलेल्या अवस्थेत आहे.कुणास ओळख पटल्यास मारेगाव पोलीस स्टेशन , ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार राजेश पुरी , बिट जमादार आनंद आलचेवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies