विदर्भ सर्च न्यूज मुळे मारेगावातील मृतकाची ओळख पटली
🔸️मृतक नेर येथील रहिवासी
🔸️सर्व सामान्यांना न्याय देणारे वृत्त पोहचले कुटुंबापर्यंत
मारेगाव : प्रतिनिधी
सातत्याने सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच विदर्भ सर्च न्यूज करीत असतो.आमच्या पारदर्शक प्रयत्नाचे फलित पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
आज एका अनोळखी,अनामिक मृतकाचे वृत्त विदर्भ सर्च न्युज या समाज माध्यमावर प्रकाशित झाले.बातमी सोशल मीडियावर सर्वदूर पोहचली, त्यातून मृतकाच्या गणगोतांनी ओळख पटविली.मृतकास अखेरचा निरोप देण्यास मुलगा व आई थेट जिल्ह्यातील नेर येथून उद्या सकाळी मारेगावात पोहचत आहे.आमच्या बातमीने आता बेवारस प्रेत ठरलेल्या त्याचा सन्मानपूर्वक अंतिम संस्कार होणार आहे.
पोलिसांच्या मनावरील ओझे कमी झाले.
एखादा अनोळखी मृतदेह आपल्या बातमीने त्यांच्या कुटुंबातील गणगोत यांना माहीत होणे हे खरंच खूप समाधानकारक बाब ठरली.अनोळखी म्हणुन त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याच्या कुटुंबातुन त्याचा अंतिम संस्कार होणार असल्याने मानवीय दृष्टीने खरंच पोलिसांच्या मनावरील ओझं हलकं झालं.विदर्भ सर्च न्यूज आभारास पात्र आहे.
ठाणेदार राजेश पुरी,मारेगाव
गत पंधरा दिवसांपूर्वी प्रकृतीने अस्वस्थ,व मानसिक बेचैन असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला आरोग्य प्रशासनाने राज्य महामार्गावरून थेट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.अबोल असणाऱ्या या रुग्णास आपले नाव , गाव सांगता आले नाही.मात्र तरीही मानवी संवेदनांचा परिचय देत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात त्याचा नियमित उपचार करण्यात आला.खंगलेली प्रकृती उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्या अनोळखी व्यक्तीचा आज शुक्रवारला सकाळी दहा वाजता मृत्यू झाला.
नाव,गावाचा ठावठिकाणा नसलेल्या या अनामीकाचा विदर्भ सर्च न्यूज नेटवर्क प्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जोपासत मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले.आणि हे वृत्त थेट त्याच्या गणगोता पर्यंत पोहचले.आपले वडील कुठे निघून गेले याचा शोध घेणाऱ्यांना आज सदर बातमीने त्यांचा मृत्यू मारेगावात झाल्याचे कळले.
मृतक हा मागील पंधरा दिवसापासून उपचार घेत असतांना आरोग्य प्रशासनात कोणतीही नोंद नाही. अखेर त्यांचा आज मृत्यू झाल्याने संवेदनशील वृत्त गाजविणाऱ्या व अल्पावधीत लोकप्रिय आणि बेधडक म्हणून परिचित असंलेल्या विदर्भ सर्च न्यूज ने हे वेदनादायी ,भावनिक वृत्त प्रकाशित करून नातेवाईकापर्यंत पोहचले.यास मारेगाव पोलिसांची जोड मिळाली.
सदर मृतकाचे नाव मोतीराम अगम रा.नेर जिल्हा यवतमाळ असून त्यांचे मागील काही महिन्यांपासून मानसिक स्वास्थ्य बिघडले होते.आणि एक महिन्यांपूर्वी त्यांनी घर सोडले होते .अशा आशयाची फिर्याद नेर पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.दरम्यान सामाजिक तथा न्यायिक प्रश्नाला सदैव परखड भूमिका मांडणाऱ्या विदर्भ सर्च न्यूज नेटवर्क मुळे या अज्ञात इसमाची ओळख पटली असून त्यांचे गणगोत उद्या शनिवारला मारेगाव येथे दाखल होणार आहे.
यामुळे बेवारस मृतदेह ची विल्हेवाट लावण्या ऐवजी त्याचा सन्मानजनक अंतिम संस्कार होणार आहे.पत्रकारिता चे खरे अन अंतिम ध्येय साध्य झाल्याने विदर्भ सर्च न्यूज देखील समाधानास पात्र ठरला आहे.
विदर्भ सर्च न्यूज नेहमीच आपल्या परखड,सडेतोड अन सामाजीक न्याय देण्याचा आग्रही भूमिकेने सर्वसामान्य लोकांच्या पसंतीत अव्वल ठरला आहे.