बोगस बियाणे विकाल तर खैर नाही
🔸️मनसेचे राजू उंबरकर यांचा कंपन्यांना धमकीवजा सज्जड दम
मारेगाव : प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम येताच बोगस बियाणांची प्रचंड प्रमाणात विक्री होण्याची संभाव्य शक्यता आहे.असे घडल्यास कंपन्यांची खैर करणार नाही किंबहुना मनसे आपल्या स्टाईलने शेतकऱ्यांची नुकसान भरभाई वसूल करून देईल असा धमकीवजा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.
तूर्तास काळ्या आईला शालू पांघरण्याची लगबग वाढली असून बियाणांचा काळाबाजार होण्याची संभाव्य शक्यता आहे.बनावट बियाणे विक्रीस आल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होऊन कृषी प्रधान देशाचा पोशिंदा कर्जबाजारी होतो.उत्पादन घटल्याने अनेक शेतकरी जीवनाचा अखेर करतो हे वास्तव असतांना बोगस बियाणांवर आता कंपनीनेच करडी नजर ठेवावी अन्यथा कंपनीलाच मनसे वठणीवर आणेल असा गर्भित इशारा उंबरकर यांनी दिला आहे.
दरम्यान , शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सर्वत्र होते आहे.सध्या बियाणे खरेदीची रेलचेल दिसून येत आहे.कंपनीने काटेकोरपने लक्ष केंद्रित करून बनावट बियाणावर अंकुश लावावा अन्यथा कंपनीच यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून कंपनीची खैर करणार नाही.बियाणे उगविण्याची क्षमता नसलेले बोगस बियाणे आढळून आल्यास खपवून घेणार नाही असा गर्भित इशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी थेट कंपनी अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधींना धमकीवजा सज्जड दम देत कान टोचले.