मारेगावचे सुपुत्र , बीडचे प्रभारी समाजकल्याण आयुक्त डॉ.सचिन मडावी निलंबित
🔸️मारेगाव तालुक्यात वेगवेगळ्या खमंग चर्चेला उधाण
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव येथील सुपुत्र तथा बीड येथील समाज कल्याण विभागातील प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन शंकरराव मडावी यांचेवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आल्याने समाजकल्याण विभागासह मारेगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मारेगाव येथील माजी नायब तहसीलदार तथा स्वीकृत नगरसेवक शंकरराव मडावी यांचे चिरंजीव असलेले डॉ.सचिन मडावी मागील काही वर्षांपासून बीड येथे समाजकल्याण प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहे.
बीड जिल्ह्यातील अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत अनियमिततेचा त्यांचेवर ठपका ठेवण्यात आला.यासंदर्भातील तक्रार बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य अजय सरवदे यांनी केली होती.
तक्रारीची गंभीर दखल घेत प्रादेशिक आयुक्तांनी औरंगाबाद येथील प्रादेशिक उपायुक्त यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करीत चौकशीचे आदेश दिले होते.चौकशीत डॉ. सचिन मडावी यांचेसह काही कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती ' विदर्भ सर्च न्यूज ' ला प्राप्त झाली आहे.
परिणामी सचिन मडावी यांनी मारेगाव नगर पंचायत मध्ये आपल्या वडिलांना प्रभाग क्रमांक १३ मध्ये निवडून आणण्यासाठी तब्बल ५लक्ष रुपये खर्च केले होते परंतु ते पराभूत झाले होते म्हणून निवडणूक प्रतिष्ठेची करीत तब्बल आठ लाख रुपये पुन्हां खर्चून त्यांनी आपल्या वडिलांना स्वीकृत नगर सेवक म्हणून निवडून आणल्याची खमंग चर्चा त्यावेळी बरीच गाजली होती.
दरम्यान निलंबनाच्या कारवाईने मारेगाव तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला प्रचंड उधाण आले आहे.