चौघावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
🔸️गुन्ह्यात एका महिलेचा समावेश
🔸️अटकेसाठी पोलिसांची धरपकड
🔸️वेगळे दाम्पत्य चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
🔸️संशायीत आरोपींचा गावातून पोबारा
मारेगाव : प्रतिनिधी
आर्थिक देवाण घेवाणचा वाद हाणामारीत झाल्याने येथील शेतकऱ्याने अपमान जिव्हारी लावत थेट विष प्राशन केले.याच दरम्यान विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने चौघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा रविवारला मृत्यू झाला आणि चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशायित आरोपीने गावातून पोबारा केला असून पोलिसांनी धरपकडची गती वाढविली आहे.
सुसाईड नोट चे रहस्य गडदमृतकाने विष प्राशन करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवल्याची माहिती ठाणेदार राजेश पुरी यांनी दिली.त्याचा तपास जलदगतीने सुरू आहे.परिणामी तपासाचा भाग म्हणून एका दाम्पत्यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.तपासांअंती काही मासे गळाला लागण्याची संभाव्य शक्यता आहे.त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविल्या जात आहे
टाकरखेडा येथील नानाजी धानकी यांनी येथीलच विलास धानकी यांना आर्थिक मदत केल्यानंतर ही रक्कम परत मागण्यासाठी गेले असता नानाजी यांना विलास धानकी , मयूर धानकी , चंद्रकला धानकी व विठ्ठल रांगणकर या चौघांनी मारहाण केली.ही अपमानास्पद घटना जिव्हारी लावत नानाजी धानकी यांनी विष प्राशन केले.यातच त्यांचा तब्बल पंधरा दिवसानंतर दुर्देवी मृत्यू झाला.विष घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करीत मृतकाच्या पत्नीने त्यांच्या उपचारादरम्यान मारेगाव पोलिसात चौघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
तक्रारीची व घटनेची गंभीर दखल घेत विलास , मयूर ,चंद्रकला धानकी आणि विठ्ठल रांगणकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून कलम ३०६ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशायित आरोपींनी गावकुसाबाहेर पोबारा केला.पोलीस संशायितांच्या अटकेसाठी मागावर आहे.