टाकरखेडा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
🔶मांगरूळ येथील पोक्सो अंतर्गत संशायितास अटक
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील टाकरखेडा येथील दोन विद्यार्थिनी शिकवणीसाठी जात असतांना एका चौदा वर्षीय विद्यार्थीनीचा हात पकडून मोबाईल नंबर मागितल्याने विद्यार्थिनीने मारेगाव पोलिसात तक्रार केली.त्यानुसार मांगरूळ येथील तेवीस वर्षीय युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.ही घटना आज गुरुवारला सकाळी अकरा वाजताचे दरम्यान घोंसा रोड वरील आय.टी. आय.नजीक घडली.
हर्षल नरेन्द्र धंदरे (२३) असे संशायित अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असुन तो टाईल्स लावण्याचे काम करतोय.मागील पंधरा दिवसापासून टाकरखेडा येथे काम करीत असतांना एका महाविद्यालयीन युवतीच्या एकतर्फी प्रेमात आकंठ बुडाला.मनात अविचार घोंगावत असतांना त्याने 'त्या ' मुलीस शिकवणीसाठी मारेगाव येथे जात असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या संशायित आरोपीने रस्त्यात अडवून तिचा हात पकडला.एवढेच नव्हे तर तिचा मोबाईल नंबर मागण्याची आग्रही भूमिका घेतली.
अपमानास्पद झालेल्या युवतीने ही बाब आई वडिलांस सांगितल्या नंतर थेट मारेगाव पोलीस स्टेशबनला तक्रार केल्यागत संशायितावर गुन्हा दाखल करून अटक केली.पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात उपनिरीक्षक गोविंद सावंत करीत आहे.
