मारेगावात आंदोलनस्थळी चिकन सेंटर
🔶व्यवस्थेला जबर धक्का , प्रशासनाची नाचक्की
मारेगाव : प्रतिनिधी
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी थाटलेले चिकन सेंटर एकाच ठिकाणी उभारण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी कालपासून नगरपंचायत समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.मागण्यासाठी तोडगा काढण्याकरिता उपोषणकर्त्यांनी चक्क चिकन सेंटर उभारण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाच्या तकलादू धोरणाने प्रशासनाची नाचक्की होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मारेगाव येथे विविध प्रश्नासाठी तिघांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या आज दुसऱ्या दिवसाला प्रशासनाकडून ठोस पावले उचलल्या गेले नाही.त्यामुळे संतापलेल्या उपोषण कर्त्याने थेट उपोषण मंडपासमोर चिकन सेंटर सुरू करण्यात आले.
या अभिनव आंदोलनाने प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली. आंदोलन समोर मंदीर असल्याने संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.दरम्यान उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांनी उपोषण मंडपी भेट देत कुणाच्या धार्मिक भावनेला ठेच पोहचत असेल हा पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत कोंबडी असलेला पिंजरा सामंजस्याने काढण्यात आला.
काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने उपोषण स्थळी चिकन सेंटर मात्र चर्चेला भाव खाऊन गेला.