मारेगाव पेट्रोल पंपवर जम्बो भरती
🔸️बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी
🔸️अर्ज दाखल तात्काळ करण्याचे ठाणेदार राजेश पुरी यांचे आवाहन
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव शहरात अवघ्या दिवसातच भारत कार्पोरेशन पेट्रोल लिमिटेड कंपनीची पेट्रोल विक्री सुरू होत आहे.यासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून इयत्ता बारावी उत्तीर्ण बेरोजगार युवकांना कामगार म्हणून संधी प्राप्त होणार आहे.त्यासाठी १८ जून पर्यंत मारेगाव पोलीस स्टेशनला अर्ज दाखल दाखल करण्याचे आवाहन ठाणेदार राजेश पुरी यांनी केले आहे.
मारेगाव पोलीस स्टेशनच्या प्रांगणात नव्यानेच पेट्रोल पंपची निर्मिती उंबरठ्यावर आहे.अवघ्या काही दिवसातच वाहनांच्या पेट्रोल विक्री साठी लोकार्पण होणार असून येथे किमान १६ बेरोजगार युवकांना कामाची संधी प्राप्त होणार आहे.यात दोन महिला प्रवर्गाचा समावेश राहणार आहे.
सदर कामाच्या संधीसाठी १८ ते ४० वयोगटातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येणार असून किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार युवकांना मासिक वेतन ५ हजार ४९० रुपये देण्यात येणार आहे.
याकरिता अर्ज मागविण्यात आले असून अर्जासोबत बारावी पासची गुणपत्रिका सह आधार कार्ड , रहिवासी दाखला , जन्म तारखेचा दाखला , राशनकार्ड ची झेरॉक्स प्रत जोडणे अनिवार्य आहे. सुदृढ असलेल्या बेरोजगार युवक तथा युवतींनी मारेगाव पोलीस स्टेशनला अंतिम तारीख असलेल्या १८ जून २०२२ पर्यंतच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन ठाणेदार श्री.राजेश पुरी यांनी केले आहे.