करणवाडी येथे विवाहित युवकाने घेतला गळफास
🔸️केवळ चार महिन्याचा मुलगा असतांना केली इहलोकाची यात्रा
🔸️आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील करणवाडी येथील किराणा दुकान चालविणाऱ्या विवाहित युवकाने स्वतःच्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज शुक्रवारी रात्री ९.३० वाजता उघडकीस आली.या घटनेने गावात पुरती शोककळा पसरली आहे.
प्रशांत अरुण काळे (३० ) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे.तो किराणा दुकान घरासमोर चालवायचा.संध्याकाळी पावसाला सुरुवात होऊन वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्याने दुकान बंद केले.आपल्या खोलीत जाऊन गळफास घेतलेल्या अवस्थेत आई वडीलाच्या निदर्शनास येताच वृद्धांनी एकच हंबरडा फोडला.
दरम्यान , आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून प्रशांत याच्या पश्चात आईवडील सह पत्नी व केवळ चार महिन्याचा मुलगा आहे.मारेगाव तालुक्यात सातत्याने होत असलेल्या आत्महत्येच्या घटनेने तालुक्यात आत्महत्येचा आलेख वाढून मारेगाव तालुका आत्महत्येचा प्रसिद्ध तालुका म्हणून उदयास येत आहे.