नगरपंचायत प्रशासनासमोर नगरसेवकांच्या आंदोलनाचे तगडे आव्हान
🔸️उद्या उपोषणास सुरुवात
🔸️अतिक्रमणाचा वाद चिघळणार
मारेगाव : प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मधील अतिक्रमणाचा वाद आता शिगेला पोहचला आहे.जनतेच्या संवेदनशील प्रश्नांसाठी आता खुद्द नगरसेवक उद्या बुधवारपासून उपोषणास बसणार असल्याने हे तगडे आव्हान प्रशासन नेमके कसे पेलतात याकडे मारेगावकरांचे लक्ष लागले आहे.
येथील प्रभाग तेरा मधील टाईल्स च्या दुकानाच्या अतिक्रमण संदर्भात येथील किमान २५ नागरिकांनी थेट राज्य महामार्गावर असलेल्या दुकानाचे अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी नगरपंचायत प्रशासनास निवेदन दिले. हा संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने हा गंभीर प्रश्न येथील नगरसेवक अनिल गेडाम यांनी थेट उपोषणाच्या माध्यमातून सोडविण्याची येथील नागरिकांना ग्वाही दिली.
तत्पूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न नगरसेवक गेडाम यांचे करवी करण्यात आले.मात्र प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाने हा गंभीर प्रश्न निकालात निघत नसल्याचे निदर्शनात येत असल्याने प्रभागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता खुद्द नगरसेवक अनिल गेडाम हे उद्यापासून उपोषण करीत नागरिकांसाठी न्याय मागणार आहे.
अतिक्रमणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने हा संवेदनशील प्रशासन नेमके कोणते पावले उचलून मार्गी लावतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दरम्यान , प्रशासनासमोर थेट नगरसेवकांचे आंदोलन आता तगडे आव्हान ठरणार असल्याने प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.