Type Here to Get Search Results !

घोडदरा येथील शेतकऱ्याच्या मुलीने मारली बाजी दहावीच्या परीक्षेत ९५.४० % घेऊन अव्वल

घोडदरा येथील शेतकऱ्याच्या मुलीने मारली बाजी दहावीच्या परीक्षेत ९५.४० % घेऊन अव्वल

🔶या पुर्वी सुद्धा वर्ल्ड बुक रेकॉर्ड ऑफ लंडन सह अनेक रेकॉर्डवर कोरले गुंजने स्वतःचे नाव

मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील गुंजन वसंता मिलमिले हिने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५.४० % गुण घेऊन गावासह तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.

गुंजन ही ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे शिकत वर्धा जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. गुंजन च्या नावे अनेक रेकॉर्ड्स सुद्धा आहे. २०२१ मद्ये उच्च उंचीच्या वैज्ञानिक फुग्याच्या मदतीने "एकाच प्रक्षेपण साइटवर सर्वाधिक फेमटो उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. (प्रत्येकी 100 फेमटो उपग्रह वेगळ्या प्रयोगासाठी डिझाइन केलेले)" डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन - हाऊस ऑफ कलाम आणि मार्टिन ग्रुप हे संपूर्ण भारतातील विद्यार्थी एकत्र करतात. या कार्यक्रमात गुंजन सुद्धा सहभागी झाल होती. हे उपग्रह 7 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम, भारत येथे प्रक्षेपित केले गेले.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सह ,असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड रिसर्च फाउंडेशन, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, स्पेस ऑन ऑफ इंडिया यांच्याकडून गुंजन ला गौरविण्यात आलेले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलीने घेतलेली ही भरारी कौतुकास पात्र ठरत आहे.

आई-वडील शेतकरी असून घरात कुणीही सुशिक्षित नसतांना देदीप्यमान यश संपादन करणाऱ्या गुंजन चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. गुंजन हे आपल्या यशाचे श्रेय आजोबा सदाशिव मिलमिले, आजी विमल मिलमिले,वडील वसंता मिलमिले, आई सपना मिलमिले यांच्या सह शाळेतील प्राचार्य शिक्षक यांना देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies