Type Here to Get Search Results !

एकाच दिवसाच्या तीन उपोषणाने मारेगाव नगरपंचायत प्रशासन प्रभावित

एकाच दिवसाच्या तीन उपोषणाने मारेगाव नगरपंचायत प्रशासन प्रभावित

🔶वेगवेगळ्या प्रलंबित प्रश्नाने नगरपंचायत समोर तीन मंडप
🔶आंदोलनात एका वृद्धाचा समावेश
🔶तहसीलदार पुंडे , नगराध्यक्ष मस्की यांची उपोषणस्थळी भेट

मारेगाव : प्रतिनिधी
विविध प्रलंबित प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करीत असल्याने नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून निरसन करण्यासाठी वैतागलेल्या तक्रारकर्त्यांनी आज थेट प्रशासनासमोर आमरण उपोषणाचे मंडप उभारले. मारेगाव शहरात एकाच दिवसाला आंदोलनाचे तब्बल तीन मंडप उभारण्याची बहुदा पहिलीच वेळ असल्याने यावरून प्रशासनाच्या पारदर्शक एव्हाना गलथान कारभाराचा परिचय दिल्या जात असल्याच्या जनभावना उमटत आहे.
 
शहरातील वार्ड क्रमांक १३मध्ये पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर राहुल जयस्वाल यांनी अतिक्रमण करून दुकान लावल्याचा आरोप करून त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला.परिणामी नागरिकांना अनेक समस्येचा सामना करावा लागतो आहे.नागरिकांच्या संवेदनशील मागणी वरून या प्रभागाचे नगरसेवक अनिल गेडाम यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपंचायतमध्ये निवेदन दिले. तसेच मासिक सभेत ठराव ही घेतले.तरीही नगरपंचायत प्रशासन अतिक्रमण काढीत नसल्याने त्रस्त झालेले नगरसेवक अनिल गेडाम यांनी स्वतः अतिक्रमण काढण्यासाठी नगरपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले.
          
तसेच राहुल जयस्वाल यांचेच अतिक्रमणमूळे ओमप्रकाश खुराणा यांना त्यांचे प्लॉटवर जाण्या-येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. नगरपंचायतला अनेकदा तक्रारी देऊनही अतिक्रमण काढीत नसल्याने वयाच्या ८७व्या वर्षी अनेक व्याधींनी आजारी असलेल्या वृद्ध ओमप्रकाश खुराणा यांनी ही आज पासून आमरण उपोषण सुरू केले.
          
तिसरे उपोषण शहरातील चिकन विक्रेत्यांनी सुरू केले.नगरपंचायतने ठरवून दिलेल्या जागेवर अनेक वर्षांपासून हे विक्रेते व्यवसाय करीत आहे.परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरातील मोक्याच्या जागेवर नवीन चिकन दुकाने सुरू झाली. त्यामुळे यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्व चिकण दुकाने एकाच ठिकाणी स्थानांतरीत करण्यात यावे या प्रमुख अशा मागणीसाठी चिकन व्यावसायिकांनी उपोषणाचे दंड थोपटले असून नगरपंचायत प्रशासन याकडे तक्रार देऊनही लक्ष देत नसल्याने यांनी सुद्धा आज पासून आमरण उपोषण सुरू केले.
     
नगरपंचायत समोर एकाच दिवशी तीन उपोषण मंडप उभे करण्यात आल्याने प्रशासनाच्या प्रांगणाला मार्केट चे स्वरूप प्राप्त झाले आहे.एकाच दिवसाला तब्बल तीन आंदोलन उपोषनाच्या माध्यमातुन होत असल्याने प्रशासन जनसामान्यांचे प्रश्नावर किती गंभीर आहे याबाबत तर्कवितर्काला कमालीचे उधाण आले आहे.

तहसीलदार पुंडे , नगराध्यक्ष मस्की यांची उपोषण मंडपास भेट
आंदोलनाची धग मारेगावात पेटत असतांना मारेगावचे तहसीलदार दीपक पुंडे व नगराध्यक्ष मनीष मस्की यांनी उपोषण मंडपात भेट देऊन तिघांच्या भावना समजून घेतल्या. यावर तात्काळ तोडगा काढून प्रलंबित प्रश्न निकालात काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी तहसीलदार पुंडे यांनी " विदर्भ सर्च न्यूज " शी बोलतांना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies