Type Here to Get Search Results !

श्वान पथकातील 'लुसी' ला मारेकऱ्यांचा शोध घेण्यास अपयश

डोर्ली हत्येचं रहस्य गडद...

श्वान पथकातील 'लुसी' ला मारेकऱ्यांचा शोध घेण्यास अपयश

🔸घटनास्थळी ठोस पुरावा नसल्याने तपासाला अडथळा
🔸पोलिसांसमोर तगडे आव्हान

मारेगाव :दीपक डोहणे
तालुक्यातील डोर्ली येथील शेतकऱ्याच्या हत्येप्रकरणी वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून पोलिसांनी तपासाची दिशा ठरविण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केले.मात्र श्वान पथकातील ' लुसी ' ला मारेकऱ्यांचा शोध घेण्यास प्रचंड अडचण निर्माण झाली.घटनास्थळी एकही पुरावा नसल्याने लुसी केवळ वीस फुटांपर्यंत जावून माघारी परतली.त्यामुळे मारेकऱ्यांचा दिशा पर्यंत जाण्यास लूसी लाही अपयश आले.आता मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

डोर्ली येथील शेतकरी विलास गोहोकार हे रविवारी रात्री शेतात जागल करण्यास गेले.सोमवारला सकाळी भाऊ सतीश हे शेतात जाताच विलास यांचा मृतदेह दिसला.या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून विलास यांच्या गळ्याभोवती दोरीने आवळल्याचे व्रण व चेहऱ्यावरील मार यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा कयास व्यक्त होत आहे.

दरम्यान , मारेकऱ्यांनी शिताफीने हे कृत्य केल्याचे निदर्शनास येत आहे.मृतक विलासच्या चप्पल घटनास्थळावर नाही , मोबाईल वेगळ्या ठिकाणी तर मोबाईलपासून किमान शंभर फुटावर मृतदेह , त्यामुळे हत्या वेगळ्या ठिकाणी करून मृतदेह आणून ठेवला असावा अशी साशंकता निर्माण होत आहे.

परिणामी , विलासची हत्या करण्यात आली असावी या शंकेला वाव असल्याने तपासाची दिशा ठरविण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले.मात्र श्वान पथकातील लुसी ला ठोस पुरावा उपलब्ध झाला नसल्याने मृतकाच्या घटनास्थळापासून केवळ वीस फुटापर्यंत सैरभैर फिरत माघारी परतली.त्यामुळे मारेकऱ्यांची दिशा आणि शोध घेण्यास प्रचंड अडसर निर्माण होऊन अपयश आले.सदर हत्येचा उलगडा करण्यास आता पोलिसांसमोर तगडे आव्हान उभे ठाकले असून मारेकऱ्यांचा शोध कसा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies