वणी येथील बेपत्ता वृद्धाने घेतला वेगाव येथे गळफास
🔸️नातेवाईकांनी पटविली ओळख
🔸️सलग दुसऱ्या घटनेने मारेगाव तालुका प्रभावित
मारेगाव : कैलास ठेंगणे
वणी येथील वयोवृद्ध इसम बेपत्ता झाल्याची बातमी समाजमाध्यमावर घिरट्या घालत असतांना त्या बेपत्ता वृद्धाचा मृतदेहच वेगाव शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.काही तासापूर्वी डोर्ली येथील घटना आणि वेगाव येथील गळफास घटनेने मारेगाव तालुका प्रभावित झाला आहे.
वणी येथील सुभाषचंद्र बोस वार्डातील बंडू हेपट हे ६६ वर्षीय वृद्ध ७ मे रोजी घरून निघून गेल्याचे वृत्त समाजमाध्यमावर प्रकाशित होत होते. आज सोमवारला सकाळी वेगाव येथील मठासमोर एका झाडाला त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
तीन दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. मृतकाच्या दुर्गंधीने गळफास ही बाब उघडकीस आली.
दरम्यान मृतकाच्या नातेवाईक घटनास्थळी पोहचले असून त्यांनी मृतकाची ओळख पटविली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.परिणामी मारेगाव तालुक्यातील डोर्ली आणि वेगाव घटनेने मारेगाव तालुका प्रभावित झाला आहे.