पिसगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी सुदर्शन टेकाम तर उपाध्यक्षपदी गणूजी थेरे
मारेगाव : प्रतिनिधी
पिसगांव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये आज दिनांक १० मे रोजी मंगळवारला अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून श्री सुदर्शन टेकाम तर उपाध्यक्षपदासाठी गणूजी थेरे यांची एक मताने निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून शासकीय अधीक्षक श्री गवई सचिव दिपक ठावरी निदर्शनात निवडणूक पार पडली. या निवडणुकीला प्रमुख उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय मारुती गौरकार; श्री अंकुश माफुर ,सरपंच सदाशिव नारायण मांदाडे; मेश्राम शुक्रात दूधकडे ;हनुमान जुमनाके; यशवंत याकअली; अजनी सिडाम; श्रीराम गेडाम; शंकर बावणे; गणेश बावणे; सोनु झाडे व अनेक सहकारी मित्र निवडणूक प्रक्रियाला उपस्थित होते.
या वेळी नवनिर्माण सदस्य गणुजी थेरे सुदर्शन टेकाम भुषण कोल्हे राजु पाचभाई श्रीकृष्ण मडावी विजय घोरपडे फकरु कुमरे विनोद आत्राम दिवाकर हस्ते रामकिसन येरकाडे गुणवंत मडावी चंद्रदीप काकडे वंदना सीडाम फुलबाई जुमनाके सर्व संचालक मंडळ उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांकडून अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व नवनियुक्त सदस्यांना शुभेच्छा प्रदान करून जल्लोष करण्यात आला.