पहापळ अपडेट....
दोनशे रुपयाची दारू पिऊन आरोपी बनला हैवान
🔶आरोपीस तीन दिवसाचा पी.सी.आर.
🔶नराधमास फाशीची मागणी
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पहापळ येथील नराधम आरोपीने तब्बल दोनशे रुपयाची दारू पिऊन समाजमन सुन्न करणारे कृत्य केले.बालिका बेपत्ता असल्याची ध्वनिक्षेपकावरून आवाहन गावकऱ्यांनी केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून परत येऊन गावात जनसमुदायात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना दिली.आरोपीच्या अटकेनंतर आज पांढरकवडा सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.
मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील शौचास गेलेल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून निपचित पडलेल्या कोवळ्या कळीला आरोपीने थेट एका शेतात असलेल्या काटेरी फासाच्या मधोमध टाकले.वरून पुन्हा काट्या टाकुन त्यावर दगड ठेवले .दोनशे रुपयाची दारू पिऊन झिंगलेल्या अवस्थेत असलेला मारोती भेंडाळे हा विकृत नराधम काट्याच्या फासावर मोठमोठे दगडही टाकले.दारूच्या नशेत असलेला आरोपीस बालिका मृत पावल्याचा भास झाला.इकडे गावात ध्वनिक्षेपकावरून बालिका हरविल्याची घोषणा करीत सर्वांनी शोधार्थ एकत्र जमायचे आवाहन करण्यात आले. तितक्यात आरोपी हा गावात आला.कुणाची शंका जाऊ नये म्हणून समुहासोबत शोध घेऊ लागला.मात्र बलिकेच्या रात्रभर कानोसा लागला नव्हता.सकाळी शेतातील एकास तिचा आजी म्हणून आवाज आला आणी रक्तबंबाळ अवस्थेत तिला बाहेर काढले.इकडे आरोपीने गावातून पोबारा केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली.
दोनशे रुपयांची दारू पिऊन हैवान बनलेल्या आरोपीस मारेगाव पोलिसांनी वडकी येथून अटक केली.आज त्याला पांढरकवडा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची ( रविवार पर्यंत )पोलीस कोठडी सुनावण्यात आली.समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेने अनेक सामाजीक संघटना आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी पुढे सरसावणार असल्याची माहिती आहे.स्त्री शक्ती संघटना च्या अध्यक्ष किरणताई देरकर यांच्या सह जवळपास १०० प्रतिष्ठित महिलांनी अत्याचार पीडित बालिका व तिच्या आई वडिलांची भेट घेतली.या महिला सदर खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपींस फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी प्रचंड आक्रमक होणार आहे.