Type Here to Get Search Results !

ध्येयवेड्या सरपंचांनी केला गावाचा कायापालट

ध्येयवेड्या सरपंचांनी केला गावाचा कायापालट 

🔸️कोलगाव ग्रामपंचायतीची विकासाकडे वाटचाल
🔸️जनसुविधा विशेष योजनेअंतर्गत रस्ता निर्मितीच्या कामाला सुरवात
मारेगाव:- प्रतिनिधी 
समाजकारणाला राजकारणाची जोड देत गाव विकासासाठी प्रेरित झालेल्या कोलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अभिषा राजू निमसटकर आणि त्यांच्या टीमने खेचून आणलेल्या गाव विकास निधीच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा  सपाटाच लावल्याचे दिसते आहे. 
आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते अगदी आठवड्यापुर्वी पार पडलेल्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर पुन्हा एकदा जनसुविधा विशेष योजनेअंतर्गत पाच लक्ष रुपये किमतीच्या विकास निधीच्या सिमेंट कॉक्रिँट रस्ता निर्मीतिच्या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी जि. प. सदस्य अनिल देरकर यांचे हस्ते अकरा मे चे सायंकाळी सात वाजता संपन्न झाला. 

मारेगाव तालुक्यातील कोलगाव या गावची तशी ओळख... अनेक वर्षापासून मुत्सद्दी राजकारण्यांच, गर्भश्रीमंतांच, प्रगतिशील शेतकऱ्यांच, सामाजिक-सांस्कृतिक वारसा जपणारं गांव अशी काहीशी होती. 
मात्र, मागील काही वर्षापासून ही ओळख पूर्णत: पुसल्या जाते की काय, अशीच काहीशी स्थिती प्रत्यक्ष गांवची. गावातील प्रत्येक रस्त्यात-गल्लीत घराच्या दारापर्यंत वाढलेलं अतिक्रमण, रस्त्या-रस्त्यावरच्या सांडपाण्याचा भयावह उभा ठाकलेला प्रत्येकासमोरचा प्रश्न,  आरोग्य-स्वच्छता-हागणदारी मुक्त गांव आणि पाणी प्रश्न इतकेच काय तर स्मशानभूमि कडे जाणा-या रस्त्याचा भयावह प्रश्न, कित्येक दिवसांपासून गाववासियांसमोर आव वासून उभा ठाकला होता. याला कारनही तितकेचं मजबूत होते. 
प्रत्येकचं माणूस आपाआपल्या परीने राजकारणाच्या चक्रव्युहात अडकलेला होता.  गांवविकासाचे प्रत्येकच कामात या ना त्या दिशेने राजकारण येत असल्याने गांवविकास बाजुलाचं राहत होता. कुणाचा कुणालाही पायपोस नव्हता. 

अश्यातचं पुन्हा एकदा ग्रा.प. सार्वत्रिक निवडणूक आली. आणी  गावातल्या जाणत्या सजग नागरिकांनी होतकरू उमेदवारांना पूढे करीत समाजकारणाला राजकारणाची जोड देत, निवडणुकीचे मैदान गाठले. त्याला गांवक-यांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. गावच्या सत्तेची किल्ली हाती घेतली. आणी गांवविकासाच्या पथ पथप्रगतिचा श्रीगणेशा झाला. 

सरुवात झाली ती आराध्य दैवताच्या मंदीर वास्तू निर्मानापासुन. मागील वर्षीच्या महाभयंकर कोरोनाचे काळातही गावकऱ्यांनी लोकसहभागातून, विभागाचे आराध्यदैवत असलेले विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज यांच्या मंदिराचे निर्मितीला सुरुवात केली. आणि पाहता पाहता जवळपास पंधरा ते सोळा लक्ष रुपये किंमतीची सुशोभित अशी देखनी भव्य वास्तू, गावाच्या प्रथमदर्शनी उभी राहिली.  

मागील वर्षीच्या याचं काळात,
गावावर भयावह अशा कोरोना ने दुष्टचक्र फिरविले होते. गावातील अनेकांना कोरोणाचे काळात आपला जीव गमवावा लागला होता. कोरोनाचे काळात संपूर्ण गावातील परिस्थिती अत्यंत भयावह अशीच काहीशी होती. सामाजिक दायित्व जपलेल्या ग्रामपंचायत टिमसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जिद्दीने याही प्रश्नाला सामोरा जायचे ठरविले आणि गावातील प्रत्येकानेच कोरोना टेस्ट सह कोविड लसीकरण करुन घेण्यास आरोग्य प्रशासनास मदत केली. 
विशेष बाब म्हणजे, या घटनेची दखल शासनाच्या आरोग्य प्रशासनाने घेत कोलगाव ग्रामपंचायतीला शासनाचा कवच-कुंडल अभियानाचा प्रथम पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमोल पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस चव्हाण यांच्या विशेष हस्ते जिल्ह्याच्या शाही समारंभात कामगार दिनी पुरस्कार प्रदान केला. या अभिनंदनीय घटनेने गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्काराच्या रूपाने मानाचा तुरा रोवला गेला, हे विशेष. 

आता गरज होती ती शासन-प्रशासन आणी लोकप्रतिनिधींकडून गाव विकास निधी खेचून आणत, गावचा विकास साधण्याची. आणि त्यालाही सुरुवात झाली...  

सांडपाण्याचा भयावह प्रश्न लक्षात घेऊन, संपूर्ण गावात शौच्छ खड्ड्याचे निर्मितीला सुरुवात झाली. नळ जोडणी पासून तर सार्वजनिक स्वच्छालयाच्या बांधकाम निर्मिती पर्यंत काम पूर्णतः प्रगतिपथावर आले. इतकेच नाही तर, वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्नही निकाली निघाला. याचं रस्त्यासाठी आमदार संजीवरेड्डी बोद्कूरवार यांनी गावाला दहा लक्ष रुपये किमतीचा विकास निधी दिला. दलित सुधार योजनेतून दलित समाज बांधवांच्या दारापर्यत जाणारा रस्ता-नालीचा प्रश्न देखील मार्गी लागला. एकूणच काय तर विकासाच्या पथप्रगतीला नव्या दमाने सुरुवात झाली आणि हा मंगल प्रसंग गावक-यांनी "याचं देही याची डोळा" आमदार संजीव रेड्डी यांचे हस्ते नुकताच पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी अनुभवलाही होता. 

असाच पुन्हा एक विकासकामाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. जनसुविधा विशेष योजना निधीमधून पाच लक्ष रुपये किमतीच्या रस्ता निर्मितीसाठी माजी जी.प.सदस्य अनिल देरकर यांचे प्रयत्नातून निधी मिळाला. याचं विकासकामाचा भूमिपूजन सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, सरपंच सौ अभिषा राजू निमसटकर उपसरपंच प्रदीप नानाजी वासाडे,ग्रा.प. सदस्य रविंद्र बंडू आत्राम, सौ.रवीता प्रदीप अवताडे, सौ.जया अमोल जुनगरी, गुरुदास घोटकर, ग्रामसेवक अनिल रामटेके, ग्रा.प. कर्मचारी मनोहर निमसटकर यांच्यासह वी.का.सह.सो.मारेगांवचे उपाध्यक्ष गजानन घोटेकर, पो.पाटिल अरुण निमसटकर, सामाजिक कार्यकर्ते संजय पारखी, अरुण बलकी, वामन धोंगळे, गंगाधर जुनगरी, सुनिल वासाडे, हरिदास वासाडे, बंडू भोयर, पुरुषोत्तम बोढे, विठ्ठल मिलमिले, सतिश निब्रड, कमलाकर आवारी, बाबाराव वासाडे, शालिकराव विंचू, बबन गौरकार, विनोद बोबडे, बलवंत आस्वले, राजु नागरकार, सुरेश गौरकार, अरविंद नागरकर यांच्या सह सौ.छाया आवारी, तुळसा आवारी, शिंधूताई वासाडे, विजया वासाडे, सुनिता वासाडे, सुमन दर्वे, छबुबाई आवारी यांचेसह गांवक-यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला... 

गाव विकासाचा हा पथ-प्रवास असाच कायम ठेवण्याचा मनोदय गावच्या सरपंच सौ अभिषा राजू निमसटकर व त्यांच्या टीम सह सामाजिक कार्यकर्त्यांनी कायम ठेवण्याचा प्रण केल्याचे दिसते आहे. येत्या दिवसात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणारा पांदन रस्ता देखील शासन दरबारी मांडून झगडून आनू आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता निर्मितीचे काय पूर्ण करू व बळीराजा शेतकऱ्यास समृद्ध करू, असाही विश्वास टिमने व्यक्त केला आहे.  
या संपुर्ण घटनाक्रमाचे ग्रामवासीयांकडून मनापासून कौतुक होते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies