पांदण रस्त्यासाठी मारेगावकरांचे उपोषण
🔸️रखरखत्या उन्हात आणि प्रचंड उकाड्यात
🔸️आंदोलनासाठी नगरपंचायतचे तकलादू धोरण कारणीभूत
मारेगाव : प्रतिनिधी
शेतात जाण्यास प्रचंड अडथळा निर्माण झालेल्या डी. फॉर्म. कॉलेज रस्ता तात्काळ खडीकरण करून दुरुस्त करण्यात यावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या प्रमुख न्यायिक मागणीसाठी प्रभाग क्रमांक एक व दोन येथील नागरिक आज दि.१२ मे पासून नगरपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण करीत आहे.
येथील प्रभाग क्रमांक एक मधील सरकारी विहिरीपासून डिफॉर्म कॉलेज कडे जाणार रस्ता अनेकानेक वर्षांपासून आहे. यारस्त्याने येथील प्रभाग एक व दोनचे नागरिक शेतात जाण्यासाठी येजा करतात.मात्र सदर रस्त्याने प्रभागातील सांडपाणीने या रस्त्याची पुर्णतः वाट लागली आहे.त्यामुळे येथील नागरिकांना येजा करण्यास नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे.
याबाबत नागरिकांनी वारंवार प्रशासनास निवेदने देऊन कायम दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.परिणामी रखरखत्या उष्णतेची लाट व प्रचंड उकाडा असतांना स्थानिक प्रशासनाने येथील नागरिकांवर उपोषण आंदोलनाची नामुष्की आणल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
तात्काळ पांदण रस्ता व पूल उभारणीसाठी उमेश चिंचुलकर , शेख अनवर , जीवन सातपुते , हरिदास चिंचुलकर , राजेंद्र राजूरकर , सतीश बदकी , अतुल देवगडे यांचेसह अनेकांनी नगरपंचायत प्रशासन समोर आंदोलन सुरू केले आहे.
सदर कामाचा सर्वसाधारण सभेत ठराव घेवून प्रस्ताव निधीसाठी पाठवू यासाठी तात्काळ आम्ही प्रयत्नशील आहोतडॉ.मनीष मस्कीनगराध्यक्ष, मारेगाव