महावितरणच्या चुकीचा फटका ग्रामपंचायतीला
🔸️इंदिराग्राम दिवस-रात्र पथदिवे सुरू
🔸️विजेचा अपव्यय
मारेगाव:- प्रतिनिधी
स्वच्छ धुतल्या तांदळाची प्रतिमा असलेल्या महावितरणने गावात थ्री फेजची कामे केली. काम करताना चुकीच्या पद्धतीने पथदिव्यांची वीज जोडणी करण्यात आली. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून इंदिराग्राम गावातील पथदिवे दिवस-रात्र सुरू असल्याने ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे.
सध्या राज्यात वीज टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अघोषित भारनियमन सुरू आहे. मात्र महावितरण विजेचा अपव्यय करण्यासाठी पुढारपण घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कुंभा परिसरातील इंदिराग्राम येथे मागील दीड महिन्यापासून पथदिवे दिवस-रात्र सुरू आहे. महावितरणने गावात विजेची कामे करताना चुकीच्या पद्धतीने पथदिव्यांची जोडनीं केली.त्यामुळे पथदिवे दिवस-रात्र सुरू आहे. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांना या गंभीर बाबी बाबत अवगत केले. मात्र निगरगट्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे सपेशल दुर्लक्ष केले. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामपंचायत लाखोंचे बिल येणार आहेत. त्यामुळे करणी एकाची व भरणी दुसऱ्याला करावी लागणार आहे. त्यामुळे महावितरण प्रति नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला.