मागणी...
पहापळ येथील नराधमास फासावर लटकवा
🔸️मारेगाव तालुका काँग्रेसचे तहसीलदार तर शिवसेनेचे ठाणेदार यांना साकडे
🔸️समाजविघातक कृत्याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पहापळ येथील समाजविघातक कृत्याचा सर्व स्तरातून निषेध होत असताना मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी व तालुका शिवसेनेच्या वतीने प्रशासनास निवेदन देत नराधमास फासावर लटकविण्याची मागणी केली आहे.
९ मे रोजी पहापळ येथील विकृत नराधमाने अवघ्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून काटेरी फासात फेकले.सुदैवाने जीव वाचलेल्या बालिकेच्या हाकेने आरोपी मारोती भेंडाळे नराधमाचे बिंग फुटले आणि पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
या घटनेचा समाजमनात तीव्र शब्दात निषेध होत असतांना मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अरुणा खंडाळकर , तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह तहसीलदार यांना तर तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख संजय आवारी यांचे नेतृत्वात ठाणेदार यांना निवेदन देत नराधमाची न्यायालयीन प्रकरण फास्टट्रॅक चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी दोन्ही पक्षांकडील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.