नराधमाच्या फाशीसाठी मनसेचा मारेगावात गुरुवारी मोर्चा
🔸️सरकार तर्फे अँड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी
🔸️खटला फास्टट्रॅक मध्ये चालविण्यात यावा आदी मागण्या आंदोलनाच्या रडारवर
मारेगाव : प्रतिनिधी
पहापळ येथील नराधमास फाशीवर लटकविण्याची शासनातर्फे अँड . निकम यांची नियुक्ती करून खटला फास्टट्रॅक मध्ये चालविण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी येत्या १९ मे गुरुवार रोजी मारेगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे मार्गदर्शनात महिला जिल्हा अध्यक्षा अर्चना बोदाडकर , महिला जिल्हा उपाध्यक्ष अंजुम शेख , जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या नेतृत्वात मार्डी चौक येथून निघणारा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे.
गेल्या ९ मे रोजी सहा वर्षीय बालिकेवर मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील विकृत मनोवृत्तीच्या मारोती भेंडाळे याने अत्याचार करून काटेरी फासात टाकले होते.या संवेदनशील प्रकरणाचा सर्वस्तरातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे.
परिणामी मनसे कडून पिडितेस न्याय मिळवून देण्यासाठी मारेगाव येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सदर मोर्चात तालुक्यातील तमाम जनतेंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आले आहे.