डोर्ली शिवारात शेतकऱ्याची हत्या ?
🔸️शेतात आढळला मृतदेह
🔸️२०० फुटावर मोबाईल
🔸️तर्कवितर्कला उधाण अन गावात हळहळ
मारेगाव: दीपक डोहणे
तालुक्यातील डोर्ली शिवारात असलेल्या भावाच्या शेतात गळा आवळून , चेहऱ्याला जखमा असलेल्या अवस्थेतील शेतकऱ्याचा मृतदेह आज सोमवारला निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे.
विलास करणूजी गोहोकार (४८) रा.डोर्ली असे मृतदेह आढळलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.ते नेहमी प्रमाणे शेतात रात्री जागल करण्यासाठी रविवारच्या रात्री शेतात गेले.त्यांच्या शेत लगत असलेल्या भावाच्या शेतात विलास यांचा मृतदेह सोमवारी सकाळी भाऊ सतीश गेल्यागत निदर्शनास आला.मृतदेहाच्या घटनास्थळा पासून किमान २०० फुटावर त्यांचा मोबाईल होता.मृत देहाच्या गळ्याला दोरीने ओढल्याचे व्रण असून चेहऱ्यावर मारल्याचा जखमा आहे.त्यामुळे त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा कयास व्यक्त होत आहे.
श्वान पथकाला पाचारणघटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रकरणाचा सकारात्मक छडा लावण्यासाठी यवतमाळ वरून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.श्वान पथक आल्यागत नेमकी हत्येच्या दिशेचा उलगडा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, विलास गोहोकार यांच्या मुलाचा आठ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतांना त्यांचा खून का करण्यात आला असावा ? याबाबत तर्कवितर्कला उधाण आले आहे.मृतकाच्या पश्चात एक विवाहित मुलगी व मुलगा आहे.या घटनेने डोर्ली शिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात हलविण्याचा प्रक्रिया सुरू होती.