मारेगावात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भास्कर पेरे पाटील यांचे जाहीर व्याख्यान
🔸️मारेगाव तालुका अ. भा. सरपंच परिषदेचा पुढाकार
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच मा. भास्कर पेरे पाटील यांचे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यान येत्या ११ मे रोजी स्थानिक कृ. उ .बा .समितीच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषद मारेगाव तालुका यांच्या वतीने करण्यात आलेल्या व्याख्यानाचा लाभ समस्त सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजीवरेड्डी बोदकूरवार राहणार आहे. माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर. मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजु उंबरकर , स्वागताअध्यक्ष म्हूणन सरपंच कुंभा अरविंद ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हूणन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वसंतराव आसुटकर. माजी जि प. सदस्य अनिल देरकर. माजी जि. प. सदस्य सौ अरुणाताई खंडाळकर, माजी पं. सभापती सौ. शीतलताई पोटे. माजी उपसभापती संजय आवारी, माजी पं. सदस्य. सौ सुनीताताई लालसरे. तहसीलदार दीपक पुंडे ,गटविकासअधिकारी गोपाल कल्हारे ,पोलीस निरीक्षक राजेश पुरी , सामाजिक कार्यकर्ते शंकरभाऊ लालसरे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक अॅड रुपेश ठाकरे प्रमुख पाहुणे म्हूणन उपस्थित राहतील.
११ मे रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.